आजकाल फेसबुक वर एक नवीनच trend पाहायला मिळतोय. कुणीतरी एक जण येतो (विशेषता फेसबूक ग्रूप वर) आणि आपण ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ काढू म्हणत सर्वाना mobile क्रमांक देण्याची विनंती करतो, आणि त्याच्या विनंती ला साद देत १५०-२०० सदस्य बिनधास्त क्रमांक देऊन टाकतात. सर्व जण आपला क्रमांक देतात खरे पण ह्या प्रकारातून निर्माण होणारया धोक्यांकडे कुणीही लक्ष देत नाहीत, त्या करीताच हा लेख.
मुळात आपली खासगी माहिती फेसबुक वर टाकू नका असे नेहमीच सांगितले जाते. अन तरीही आपण आपला मोबाईल क्रमांक इतक्या खुलेआम टाकावा ह्याचा विचार आपण करीत नाही.तुम्ही म्हणाल दिला number तर काय झाले? त्यात काय एवढे? पण ह्यात देखील बरेच धोके आहेत. मुळात “cyber crime’ मध्ये तुमचा मोबाईल क्रमांक आणि बाकीची खासगी माहिती म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे, तीच इतक्या सहज पणे तुम्ही खुली करत असाल तर धोका वाढतोच.
टीप:पुढे दिलेली माहिती हि अर्धवट,संभ्रमात टाकणारी आहे असे तुम्हाला वाटू शकते,पण संपूर्ण माहिती इथे देणे शक्य नाही.
काय होते mobile number चे:
१. तुम्हाला कधी विनाकारण कर्ज देणाऱ्या संस्थांचे, विमा उतरवणाऱ्या कंपन्यांचे फोन येत असतील, आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ह्यांना माझा ‘number’ कोणी दिला? तर तो ह्यांना इथूनच मिळाला असण्याची शक्यता आहे. (ह्या प्रकाराला ‘data gathering/data collection’ अशी तांत्रिक नावे आहेत, आणि हो हा हजारो रुपये कमावण्याचा सहज सोपा मार्ग आहे)
२. हे जरा जास्तच गमतीदार आणि तितकेच धोकादायक, तुमच्या पैकी किती जण mobile number लाच ‘PASSWORD’ म्हणून वापरता हो? ह्याचाही विचार करा.
३. कुणीतरी पोस्ट टाकली, number गोळा केले, पण ग्रुप काढलाच नाही, मग तो data कुठे गेला?
४. तुम्ही number दिलात आणि त्याचा वापर cyber criminals नि फसवेगिरी, धमकेबाजी सारख्या गुन्ह्यात केला तर? होय, इतरांच्या क्रमांकावरून call करणे, sms करणे शक्य आहे,आणि ह्याच पद्धतीचा वापर दहशतवादी करावायांमधून झाल्याचे उघड आहे. अशा प्रसंगी number तुमच्या नावावर असल्याने कायद्याने तुम्हाला जबाबदार धरले जाते.
सरळ स्पष्ट सांगतो, कुठेही तुमचा number देऊ नका, अनोळखी व्यक्तीला नाहीच नाही. सर्वात मोठा धोका हा क्रमांक चोरून तो विकल्या जाण्याचा आहे. (number विकणे म्हणजे काय ते सांगेल कधीतरी, पण असे number गोळा करून ते मार्केटिंग company ला विकण्याचा काळा उद्योग छुप्या पद्धतीने सुरु असतो आणि ह्यात लाखोंची उलाढाल आहे.)
त्यामुळे सुरक्षित राहा.तुमची खाजगी माहिती फेसबुक वर टाकणे आता बंद करा.
आपण सर्वांनी सुरक्षित राहावे ह्या विचाराने थोडक्यात म्हणणे मांडले आहे. सविस्तर माहिती करिता comment चा पर्याय आहेच.