प्रवासवर्णन

2 Results

प्रवास – अनुभवांची शिदोरी

आयुष्य हा एक प्रवास आहे आणि ह्या आयुष्यात अनेक प्रवास आहेत. भाकरीच्या शिदोऱ्या बांधून प्रवासाला निघतात, अन अनुभवांच्या शिदोऱ्या घेऊन घरी परततात. आयुष्यातला प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन अनुभव घेऊन येतो आणि बरंच काही शिकवून जातो.

रम्य ही स्वर्गाहून लंका

श्रीलंका म्हणजे काय, भारताने टाकलेला पोलिओ ड्रोप म्हणून आपण भारतीय हिणवणार. ज्याची गणना आपण रावणाची लंका म्हणून करतो त्या देशाचे चित्र मनात रंगवताना अवघड जात होते. आपण भारतीयांना आपल्यासमोर इतरांना तुच्छ लेखण्याची जी खोड आहे, त्यानुसार श्रीलंका हा गरीब मागासलेला देश असावा अन सर्वत्र बकाली अन अविकसित अवस्था असावी असा कल्पना विलास मी केला होता. आपण भारतीय, आपण श्रेष्ठ, आपण विकसित असा मस्तवाल गर्व घेऊन मी निगाम्बो विमानतळावर उतरलो.