चिवडा

खायला काहीतरी घरात असावं म्हणून हा चिवडा आई करून ठेवायची. तो फार गोड नसायचा, फार तिखट सुद्धा नाही, त्याची आपली एक वेगळीच चव, अन ती चव कधी चुकली नाही. चिवडा म्हटलं की तीच चव जिभेवर रेंगाळते, दुसऱ्या कुठल्या चवीचा चिवडा असतो ही संकल्पनाच चुकीची आहे, कुणी दुसऱ्या चवीचा चिवडा बनवत असेल त्यांचा मी निषेध करायला तयार आहे.