मराठी नाट्यसंगीत व शास्त्रीय संगीतविश्वातील अग्रगण्य गायिका पद्मविभूषण प्रभा अत्रे यांचे आज निधन झाले. माझी भावपूर्ण श्रद्धांजली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका आणि प्राध्यापिका म्हणून प्रभा अत्रे या रसिकांच्या स्मरणात राहतील. गायिका प्रभा अत्रे यांना आजवर पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय संगीत अकादमी अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.