वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळून पुढील केवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत ३५ लढाया खेळलेला आणि त्या सर्वच जिंकलेला ‘अपराजित’ ‘अजिंक्य’ योद्धा वीर बाजीराव पेशवे. भारताच्या इतिहासात इतक्या संख्येने लढाया खेळून त्यात एकही न हरणारा हा एकमेव पराक्रमी. आपल्या अद्वितीय युद्धकौशल्य च्या बळावर दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणणारा हा पराक्रमी…!
‘जीवाची बाजी करणे’ हा वाक्प्रचार आपल्या कर्तुत्वाने जन्माला घालणाऱ्या या ‘बाजीराव’ला पुण्यतिथीनिमित्त नमन.