देवगिरीचे यादव
संभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी.