आयुष्य – एक सर्व्हर

सर्व्हर – म्हणजे जो सर्व्ह करतो तो सर्व्हर,कधीही रिक्वेस्ट आली की डाटा सर्व्ह करायचं काम ज्याकडे असतो तो सर्व्हर, आता सर्व्हर म्हणजे ते मशीन जे अहोरात्र, न थकता,न थांबता चालुच असतं,अगदी दिवसाचे चोविस तास,आठवड्याचे सातही दिवस,अगदी वर्षभर,आयुष्यभर,जो पर्यंत चालण्याची शक्ती आहे तोपर्यंत फक्त चालुच रहायचं अन आलेल्या रिक्वेस्ट ला प्रतिसाद देउन त्यांना हवा तो डाटा…Continue reading आयुष्य – एक सर्व्हर

बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक

भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले?) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र…Continue reading बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक

दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी

सुमारे २०० वर्षांपुर्वी,वाघिणीचं दुध म्हणविल्या गेलेल्या इंग्रजी भाषेच्या आगमनाच्या काळात ‘मराठी भाषेचे व्याकरण‘ वयाच्या विसाव्या वर्षी लिहून ते पूर्ण करणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२), तर्खडकर भाषांतरमाला या ग्रंथांच्या रूपाने सर्वपरिचित आहेतच. इंग्लिश भाषा शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना ती भाषा शिकणं सोपं वाटावं, या हेतूनं दादोबांनी ग्रंथाची रचना इंग्लिश व्याकरणाच्या पद्धतीनं केली. या…Continue reading दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी

लोकहितवादी गोपाळराव देशमुख

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी नवशिक्षणाची कास धरून लेखणीद्वारे समाजसुधारकाच्या भूमिकेत आलेल्या केवळ मोजक्या थोर लोकांपैकी एक होत ‘लोकहितवादी‘ अर्थात गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींची शतपत्रे नावाने प्रसिद्धी मिळालेल्या लेखमालेवरून लोकहितवादी आपल्या परिचयाचे आहेत.गोपाळराव देशमुखांना मिळालेली हि ‘लोकहितवादी‘ ओळख मुळात त्यांनी लेखक म्हणून वापरलेले टोपणनाव आहे.गोपाळ हरी देशमुख (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ – ऑक्टोबर ९, इ.स.…Continue reading लोकहितवादी गोपाळराव देशमुख

सारोळा वनपर्यटन

जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्या अन देवगिरी किल्ल्या सारखे अनेक ऐतिहासिक वारसे लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात तशी निसर्गरम्य ठिकाणांची अजिबात कमतरता नाही.म्हैसमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहेच,पण याच्या जोडीला एक नवीन वनपर्यटन स्थळ म्हणून समोर येऊ शकते ते म्हणजे सारोळा (Sarola). औरंगाबाद शहरापासून अगदी जवळच असलेलं डोंगरांच्या कुशीत वसलेलं अन गर्द वनात लपलेलं सारोळा हे अगदीच…Continue reading सारोळा वनपर्यटन

निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ

१३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम

१३ सप्टेंबर १९४८ १३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार खुले झाले तो हा दिवस.औरंगाबाद शहरापासून केवळ १०० कि.मी. अंतरावर वर्षांपासूनच स्वातंत्र्याचे वारे वाहिले असताना औरंगाबाद व मराठवाडा मात्र अजूनही निजामी अत्याचाराच्या पारतंत्र्यात खितपत होता.निजाम…Continue reading १३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम

लोकमान्य टिळक

आज 23 जुलै,म्हणजे लोकमान्य टिळकांची जयंती,अहो जयंती म्हणण्यापेक्षा याला फक्त टिळकांची आठवण काढण्याचा दिवस म्हणुया! आज ठिकठिकाणी टिळकांच्या फोटोंना हार घातले जातील,शेंगांच्या टरफलांची गोष्ट सांगतील, पण हीच गोष्ट सांगणारी अन आजकाल काहिही ‘खाणारी’ मंडळी ती टरफलंतरी सोडतील की नाही ही शंकाच आहे, कधी काळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ म्हणणारे टिळक, गरीबांची संपत्ती लुबाडुन…Continue reading लोकमान्य टिळक

भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर

आपल्या निबंधामालेतून महाराष्ट्र राज्यात तेजस्वी राजकीय विचारांचा उगम घडवणाऱ्या भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची आज जयंती. ‘निबंधमाला’ या आपल्या लेखमालेतून त्यांनी ८४ विविध विषयांवर लिहिलेले लेख आजही प्रसिद्ध आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जयंती निमित्त आदरयुक्त अभिवादन. २० मे १८५० रोजी जन्मलेला या अवलिया ने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सोबत देशात क्रांती…Continue reading भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर

वीर बाजीराव पेशवे

वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळून पुढील केवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत ३५ लढाया खेळलेला आणि त्या सर्वच जिंकलेला ‘अपराजित’ ‘अजिंक्य’ योद्धा वीर बाजीराव पेशवे. भारताच्या इतिहासात इतक्या संख्येने लढाया खेळून त्यात एकही न हरणारा हा एकमेव पराक्रमी. आपल्या अद्वितीय युद्धकौशल्य च्या बळावर दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणणारा हा पराक्रमी…! ‘जीवाची…Continue reading वीर बाजीराव पेशवे