फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल…

फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल…

गेल्या काही दिवसात फेसबुक ग्रुप येणाऱ्या पहावल्या न जाणाऱ्या अश्लील पोस्ट्स बद्दल सातत्याने तक्रारी येत आहेत,अचानक कुठूनतरी टोळधाड यावी अन सर्वांना त्रस्त करून सोडावं तसं ह्या पोस्ट्स नी सगळ्या ग्रुप्स वर उच्छाद मांडून ठेवला आहे. अगदी सज्जन वृत्तीच्या,समाजात चांगलं स्थान असलेल्या व्यक्तींच्या फेसबुक खात्यावरून सुद्धा अनेकदा अशा पोस्ट पडत आहेत,त्यावरून त्या व्यक्तींची नाहक बदनामी होत असली तरी मुद्दाम कुणी हे असे करत नाही,हे सर्व कारस्थान काही व्हायरस मुळे होते आहे.त्यामुळे अशा पोस्ट ज्यांच्या खात्यावरून होत आहेत त्या तुमच्या मित्रांवर उगीच संशय न घेता हे असे का होते ह्याची माहिती करून घ्या.

खरे पाहता अशा पोस्ट्स ची तक्रार वारंवार ग्रुप संचालक (Admin) आणि फेसबुक कडे केली जाते,ग्रुप संचालक फारफार तर त्या पोस्ट्स डिलिट करू शकतात पण फेसबुक देखील ह्या व्हायरस पुढे आता हतबल झालेला दिसत आहे.कारण मुळात हे व्हायरस फेसबुक च्या बाहेर चाललेल्या काही मालवेअर मुळे पसरत आहेत.आपण सुरक्षित पणे फेसबुक आणि आपला संगणक हाताळल्यास,अद्ययावत अॅण्टी व्हायरस वापरल्यास ह्या व्हायरस पासून आपण सहज सुरक्षित राहू शकतो.

हे व्हायरस कसे काम करतात? आणि अशा पोस्ट्स का पडतात?

अशा पोस्ट जेव्हाही येतात,तेव्हा त्या सोबत एक लिंक त्या पोस्ट खाली येते, बरेचवेळा हे काय प्रकार आहे म्हणून आपण त्या लिंक वर क्लिक करतो, बहुतेक वेळा ह्या लघुरुपात अर्थात Shortned URL (जसे की bit.ly,ow.ly ई.) त्यामुळे ह्या लिंक्स च्या मागे लपलेल्या वेबसाईट आपल्याला दिसत नाहीत. ह्या shortned URL चे कामच मुळात वेबसाईट ला झाकून लघुरुपात प्रसिद्ध करण्याचे असते जेणेकरून त्या सोशल मिडीयावर वेगाने पसरवता येतात, अर्थात सगळ्याच लघुरुपात आलेल्या लिंक्स ह्या व्हायरस नसतात तर त्यातल्या काहीच लिंक्स ह्या व्हायरस चा प्रादुर्भाव करणाऱ्या पेजेस न forward करतात.

एकदा का ह्या लिंक वर एखाद्याने क्लिक केलं की,आपण कुठल्यातरी वेबसाईट वर जाऊन पोहोचतो,त्या वेबसाईट मुळात ह्या व्हायरस पसरवण्याच काम करत असतात. काही वेबसाईट न भेट दिली की लागलीच आपल्या खात्यावरून त्या वेबसाईट ची लिंक अश्लील फोटोंसह सगळ्या ग्रुप्सवर अपोआप पोस्ट होते,ह्यात आपली browser मध्ये आपल्याला न कळत काही स्क्रिप्ट आपल्या संगणकावर रन होतात अन त्यांचे काम करतात.
काही वेबसाईट ह्या सरळ सरळ स्क्रिप्ट रन न करता त्या वेबसाईट वरून काहीतरी सोफ्टवेअर अथवा browser plugin डाउनलोड करण्याचे सुचवतात,ते सोफ्टवेअर डाउनलोड करून आपण इंस्टाल केले की तत्काळ हा व्हायरस आपल्या फेसबुक वर लिंक्स पोस्ट करू शकतो.
प्रत्येक वेळी अशा लिंक्स क्लिक करूनच हा व्हायरस आपल्या घरात पोचेल असे नाही, कधीकधी फेसबुक न वापरता,इतर अनोळखी ठिकाणावरून गाणी,सोफ्टवेअर डाउनलोड केल्यानेही हा व्हायरस संगणकात मालवेअर रुपात पोहोचू शकतो,अन असे काही होणे शक्य आहे.कारण हे मालवेअर बरेचदा आपल्या संगणकात अपोआप browser मधून वेबसाईट उघडून स्क्रिप्ट रन करतात.त्यामुळे फेसबुकच नव्हे इतर वेळी देखी खबरदारी घेणे आवश्यक असते.

ह्या पासून कसे सुरक्षित रहावे.?

१.ह्या पासून सुरक्षित राहण्याचा पहिला उपाय म्हणजे फेसबुक वर आलेल्या अशा पोस्ट्स आणि लिंक्स अजिबात न उघडून पाहणे.कारण ९०% वेळा हे प्रकार त्यातूनच घडतात. अशा पोस्ट्स दिसताच त्यांना ग्रुप संचालकांना आणि फेसबुक कडे रिपोर्ट करावे,जेणे करून त्या पोस्ट्स हटवल्या जातील.

२.आपल्या फेसबुक खात्यावरून आपण जे काही apps आणि games वापरतो त्यांची यादी फेसबुक च्या settings मध्ये असते ती व्यवस्थित तपासून त्यातील नको असलेले apps त्वरित काढून टाकावेत.

३.आपल्या web browser ला जोडलेलं गरज नसलेले Extensions/plugins/add-ons काढून टाका.बहुतेक वेळा हे extensions म्हणजे व्हायरस चं दुकान बनतात.

४.कुठल्याही वेबसाईट वरून नवीन सोफ्टवेअर अथवा गाणी फोटो इत्यादी डाउनलोड करण्याआधी ते विश्वासू असल्याची खात्री करून घ्या.अज्ञात संकेतस्थळावरून काहीही डाउनलोड करणे धोक्याचे असते.

५.तुम्ही विंडोज संगणक वापरत असाल तर एक चांगला अॅण्टी व्हायरस वापरण्यास सुरुवात करणे अत्यावश्यक आहे.केवळ इंस्टाल करून नव्हे त्याला अद्ययावत (Updated) ठेवणे आवश्यक आहे.कारण केवळ हेच नव्हे,ह्यापेक्षाही भयंकर असे व्हायरस विंडोज संगणकाला सहज बाधित करतात.

माझ्या खात्यावरून अशा पोस्ट गेल्या आहेत,माझे खाते HACK झाले आहे का? मी काय करू?

अशा पोस्ट तुमच्या खात्यावरून झाल्या असतील तर तुमचे खाते hack झाले असण्याची शक्यता अगदीच नगण्य,तरीही भीती वाटत असल्यास आपण आपला फेसबुक आणि इमेल चा पासवर्ड बदलून टाका.सोबतच अशा लिंक्स जिथे कुठे पोस्ट झाल्या आहेत त्या तिथून स्वतःच डिलिट करा अन अशा पोस्ट्स वर इतरांनी क्लिक करून नये ह्याची सुचना तत्काळ मित्रांना द्या.

मित्रांनो,या संगणकाच्या युगात असे अनेक प्रकारचे व्हायरस हल्ले नेहमीच होत राहणार ह्यात शंका नाही,कारण अगदी थोडक्यात लाखो लोकांना बाधा पोहचवण्याचा हा सहज सोपा मार्ग आहे. त्यामुळे आपणच योग्य मार्गाने संगणक वापरून स्वतःला सुरक्षित ठेवणे जास्त आवश्यक आहे.हा लेख तुम्ही इतरांना देऊन त्यांनाही अशा व्हायरस पासून सुरक्षित राहण्याचे कळवू शकता,कारण आपली सुरक्षा आपल्या हातात आहे.
अशा प्रकारच्या संगणक अथवा तंत्रज्ञान निगडीत प्रश्न असल्यास मला माझ्या ब्लॉग द्वारे संपर्क करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.