तंत्रज्ञान – आशुतोष http://ashutoshblog.in इतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख Wed, 28 Feb 2018 15:26:38 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=4.9.7 99790452 रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0/ http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0/#comments Sat, 26 Nov 2016 22:09:29 +0000 http://ashutoshblog.in/?p=223 The post रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव appeared first on आशुतोष.

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव   व्हायरस…! अगदी सामान्य कामांसाठी संगणक आणि मोबाईल वापरणाऱ्या कुणालाही ज्याची सर्वात जास्त भीती असते अशी एक गोष्ट म्हणजे व्हायरस.कारण व्हायरस आला म्हणजे संगणक खराब होणार आणि संगणक खराब होण्या मागे बहुतेकतरी एखाद्या व्हायरसचाच हात असणार अशी सामान्य धारणा झालेली आहे. त्यात आता एका नवीन […]

The post रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव appeared first on आशुतोष.

]]>
The post रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव appeared first on आशुतोष.

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव

 

व्हायरस…! अगदी सामान्य कामांसाठी संगणक आणि मोबाईल वापरणाऱ्या कुणालाही ज्याची सर्वात जास्त भीती असते अशी एक गोष्ट म्हणजे व्हायरस.कारण व्हायरस आला म्हणजे संगणक खराब होणार आणि संगणक खराब होण्या मागे बहुतेकतरी एखाद्या व्हायरसचाच हात असणार अशी सामान्य धारणा झालेली आहे. त्यात आता एका नवीन नावाची भर पडली आहे, ते नाव म्हणजे रॅन्समवेअर.

तुम्ही आजवर ट्रोजन,व्हायरस,मालवेअर,अॅडवेअर अशी अनेक प्रकारचे संगणक विषाणूबद्दल ऐकले असेलच पण आता ‘रॅन्समवेअर’ चा काळ उगवला आहे. आजवर व्हायरस ने घातला नसावा असा धुमाकूळ हे रॅन्समवेअर सहज घालू पाहत आहेत. इतके वर्ष सायबर गुन्हेगार व्हायरस आणि मालवेअर च्या माध्यमातून केवळ ‘vandalism’ म्हणजे डिजिटल गोष्टींना नुकसान पोहोचवण्याच काम करत, पण त्यांनीही आता केवळ नुकसान पोहोचवण्याच्या उद्दिष्टांपुरतं मर्यादित न राहता व्हायरस च्या माध्यमातून पैसे कमवायचा प्रयत्न चालवला आहे. कारण इतरांच्या संगणक, नेटवर्क किंवा डाटा ला नुकसान पोचवण्यात शक्ती खर्च केल्याने हाती फारसं काही लागत नाही मग त्याच गोष्टीचा अधिक दुरुपयोग करून जरा पैसे मिळवण्याची एक युक्ती म्हणून हे रॅन्समवेअर तयार झाले.

रॅन्समवेअर हे नाव अगदीच नवीन,त्यातल्या त्यात काही तंत्रज्ञ लोकांना हा शब्द जरा ओळखीचा वाटत असेल, ह्यातून सायबर गुन्हेगार पैसे कसे कमावत असतील, रॅन्समवेअर काम कसे करतात आणि त्यापासून स्वतःच्या संगणक आणि डाटा ला सुरक्षित कसं ठेवायचं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ह्या ब्लॉग मधून देण्याचा प्रयत्न.

 

काय असतात रॅन्समवेअर ?

इंग्रजी शब्द आहे ‘रॅन्सम’ ह्याचा अर्थ एखाद्या वस्तूच्या बदल्यात मागितलेली ‘खंडणी’. हे नव्याने आलेले रॅन्समवेअर अशाच प्रकारची खंडणी वसूल करण्याचं काम करतात. अनादी काळापासून मौल्यवान चीजवस्तू,दागदागिने,जमिनी किंवा गरज पडेल तेव्हा माणसाला बंदी बनवून,युद्धाची भीती घालून त्याबदल्यात खंडणी मागण्याची गुन्हेगारी पद्धत आहे.पण बदलत्या काळात आता सामान्य आयुष्यात महत्व प्राप्त झालंय ते आपल्या संगणक,मोबाईल आणि त्यावरच्या डाटाला.

रॅन्समवेअर बनवणारे सायबर गुन्हेगार अर्थात हॅकर्स नेमकं हेच हेरून अशा प्रकारचे व्हायरस तुमच्या पर्यंत पोचवत आहेत ज्याद्वारे तुमचा डाटा अथवा संगणक तुम्हालाच वापरता येणार नाही अन तो वापरायचा तर त्याबदल्यात मोजावे लागतात पैसे. उदाहरणार्थ एखाद्या सकाळी तुम्ही संगणक चालू करता पण नेहेमी सारखा तो सुरु होण्या ऐवजी एक वेगळीच स्क्रीन दाखवतो अन तुमचा संगणक आता कायमचा लॉक झाला असल्याचं लिहून येतं आणि आता तो तुम्हाला वापरायचा असेल तर तिथे दिलेल्या खात्यावर / लिंकवर जाऊन सांगितले आहेत तेवढे पैसे जमा करा तरच संगणक अनलॉक करता येईल असं लिहिलेलं असतं. अशा पद्धतीने तुमचा संगणक तुम्हालाच वापरू न देण्याची अन त्या बदल्यात खंडणी मागण्याची खोड करणारे व्हायरस प्रोग्राम्स म्हणजे रॅन्समवेअर.
केवळ संगणक किंवा मोबाईल लॉक करणंच नव्हे ते तुमच्या संगणक अथवा मोबाईल मधला डाटा इन्क्रिप्ट करतात आणि आता तो परत डिक्रिप्ट करायचा असेल तर त्या करिता पैसे भरावे लागतील अशा सूचना करतात. डाटा इन्क्रिप्ट करणं म्हणजे सामान्य इंग्रजी भाषा बदलून त्याला वेगळ्याच सांकेतिक भाषेत सेव्ह करणे जेणे करून तो डाटा वाचणे कुणालाही शक्य होत नाही अन तो तर परत सामान्य भाषेत आणायचा असेल,ज्याला डिक्रिप्शन म्हणतात,त्या करिता पैसे भरावे लागतील असा खोडसाळपणा हे रॅन्समवेअर करत आहेत.

थोडक्यात तुमचा संगणक अथवा त्यावरचा तुमचा महत्वाचा डाटा तुम्हाला वापरू न देणं अन तो वापरायचा असेल तर त्या साठी खंडणी मागणं ह्या करिता जे व्हायरस निर्माण करून सोडले जातात त्यांना म्हणतात ‘रॅन्समवेअर’. हे व्हायरस तुमचा संगणक लॉक करू शकतात अथवा तुमचा डाटा इन्क्रिप्ट करू शकतात त्यामुळे इतर कुठल्याही व्हायरस पेक्षा हे रॅन्समवेअर जास्त हानिकारक ठरू शकतात कारण आपला महत्वाचा डाटा आपल्या ताब्यात असला तरी तो वापरता येत नाही आणि ह्या व्हायरसची बाधा झाली की त्यातून व्हायरस काढून तुमचा डाटा पूर्ववत करणं जवळपास अशक्य होऊन बसतं.

 

रॅन्समवेअर बद्दल जरा अधिक माहिती:

रॅन्समवेअरची सुरुवात झाली १९८९ मध्ये, त्यावेळी फ्लॉपी डिस्क मधून पसरणारा AIDS Trojan पासून. फ्लॉपी डिस्क मधून पसरून, संगणक लॉक होताच त्याबदल्यात Ransom अर्थात खंडणी मागणारा, अन ती खंडणी पोस्टाने (गमतीशीर आहे पण त्याकाळी हाच मार्ग होता) पनामा च्या एका पत्त्यावर पाठवावी अशी सुचना करत असे. पण आता वेळ बदलली आहे, तसे रॅन्समवेअरची देखील प्रगती होत गेली म्हणावयास हरकत नाही. जसा काळ बदलत गेला तसे इन्क्रिप्शन तंत्रज्ञान वाढीस लागले आणि माहितीच्या सुरक्षेखातर केलेल्या ह्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करूनच आता अधिकाधिक नवीन असे मालवेअर आणि वायरस सायबर गुन्हेगारांनी वाढीस घातले. त्यातच जरा पैसे मिळावेत म्हणून नवनवीन रॅन्समवेअर तयार करून त्याचा प्रादुर्भाव मुख्यतः व्यवसाय आणि असे उद्योग जेथे माहितीची देवाणघेवाण अत्यंत आवश्यक आहे अशा केंद्रांना लक्ष करण्यास सुरुवात केली.

रॅन्समवेअर चे प्रकार

प्रत्येक रॅन्समवेअर काम करतो त्यानुसार त्यांचे विविध प्रकार करता येतात,पण त्यापैकी दोन मुख्य प्रकारांची माहिती इथे मी देत आहे.

 • इन्क्रिप्शन रॅन्समवेअर

  थोडक्यात नावावरूनच स्पष्ट होते, जे रॅन्समवेअर संगणकातील माहिती इन्क्रिप्ट करून ती आपल्यासाठी निरुपयोगी करतात असे रॅन्समवेअर व्हायरस ह्या प्रकारात मोडतात. असे रॅन्समवेअर संगणकात प्रवेश करताच आपल्या सर्व फाइल्स इन्क्रिप्शन द्वारे लॉक करतात आणि त्यांना अनलॉक करून पुनः वापरण्या करिता खंडणी मागतात. ह्यातील कुप्रसिद्ध रॅन्समवेअरची नावे म्हणजे लॉकी(Locky), क्रिप्टोवॉल(CryptoWall), क्रिप्टोलॉकर(CryptoLocker).

रॅन्समवेअर-क्रिप्टोलॉकर
क्रिप्टोलॉकर
 • लॉकर रॅन्समवेअर

  लॉकर रॅन्समवेअर म्हणजे अर्थातच संगणकाला लॉक करून टाकणारे रॅन्समवेअर. संगणक चालू होताच हे रॅन्समवेअर काम करू लागतात आणि संगणकावरील कुठलीही फाईल अथवा आज्ञावली (Software) तुम्हाला वापरू देत नाहीत. ह्यात हे रॅन्समवेअर कुठलीही फाईल इन्क्रिप्ट करत नाहीत मात्र संगणक लॉक करून त्या वापरूही देत नाही. पोलीस-रॅन्समवेअर (Police-Themed ransomware) आणि विनलॉकर (WinLocker) हे ह्या प्रकारात मोडणारे काही रॅन्समवेअर.

रॅन्समवेअर विनलॉकर
विनलॉकर

 

रॅन्समवेअर संगणकात येतात कसे?

सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे रॅन्समवेअर पासून सुरक्षित राहायचे कसे? त्या करिता हे व्हायरस येतात कुठून हे जाणून घेणं आवश्यक आहे. रॅन्समवेअर सामान्यतः इतर व्हायरस व मालवेअर संगणकात प्रवेश करतात त्याच पद्धतीने संगणकात शिरकाव करतात. परंतु अनेक रॅन्समवेअर हे नेटवर्क द्वारे वेगाने पसरण्यास प्रसिद्ध आहेत. उदा. तुमच्या ऑफिस मधील एखाद्याच्या संगणकात विशिष्ट रॅन्समवेअर शिरला असल्यास काही क्षणात तो त्या ऑफिसच्या नेटवर्क मधील सर्वच संगणकांवर जाऊन धडकतो आणि एकाच वेळी नेटवर्क मधील सर्वच संगणकांना हानी पोचवतो. अशा प्रकारे अगदी कमी काळात भयंकर नुकसान पोचवण्याची शक्ती ह्या रॅन्समवेअरमध्ये निर्माण केली गेली आहे.

रॅन्समवेअरचे संगणकात प्राथमिक शिरकाव करण्याचे काही प्रमुख मार्ग :

 • इमेल द्वारे आलेले स्पॅम मेल अथवा काही प्रलोभने दाखवणारे अज्ञात स्रोतांहून आलेले मेल मुख्यतः ह्या करिता वापरले जातात. इमेल उघडताच त्या सोबत असलेली जोडणी (Attachments) किंवा चित्रे ह्यांद्वारे हे रॅन्समवेअर आपल्या संगणकात डाउनलोड होतात.
 • इंटरनेट वरील रॅन्समवेअर ने प्रादुर्भाव झालेली संकेतस्थळे. (Malicious Websites)
 • मोफत वापरता यावीत म्हणून केलेली Cracked Softwares. ह्यात अनेकदा सायबर गुन्हेगार मुद्दाम अशा Cracked Softwares मध्ये रॅन्समवेअर जोडून ते इंटरनेटवर इतरांना डाउनलोड करिता उपलब्ध करून देतात.
 • वर उल्लेख केला तसे नेटवर्क वर आपोआप प्रसारित होणारे रॅन्समवेअर.
 • सोशल मिडिया साईट उदा. फेसबुक आणि लिंक्डइन सारख्या संकेतस्थळांवरून देखील सध्या हे रॅन्समवेअर (विशेषतः लॉकी) वेगाने पसरत आहे.
 • भ्रमणध्वनीला धोका पोचवण्याच्या उद्देशाने तैय्यार केलेले रॅन्समवेअर थेट संक्षिप्त मेसेज अथवा whatsapp किंवा तत्सम संपर्क अनुप्रयोगांद्वारे पसरत आहेत.

 

रॅन्समवेअर पासून सुरक्षित कसे राहावे?

रॅन्समवेअरची बाधा आपल्या संगणकाला होऊ न देणे हा एकमेव उपाय सध्या त्यापासून सुरक्षित करू शकतो. आपल्या संगणक अथवा मोबाईल मधील AntiVirus ह्यात फार काही उपयोगाचे ठरत नाहीत. कारण जे तंत्र वापरून रॅन्समवेअर संगणकात काम करतात ते AntiViurs ला शोधून काढणे अवघड जाते. सध्या ह्याप्सून सुरक्षा देऊ शकतील असे खात्रीलायक कोणतेही AntiVirus अथवा सोफ्टवेअर उपलब्ध नाही. Sophos Firewall तर्फे नेटवर्क सुरक्षित करू शकणारे रॅन्समवेअरविरोधी टूल बनवल्याचा दावा केला आहे मात्र हे केवळ उद्योग व आस्थापनांच्या फायरवाल वर उपयोगात आणले जाऊ शकतात. सोबतच Kaspersky Anti Ransomware आणि MalwareBytes तर्फे हे सुरक्षा करणारे रॅन्समवेअर विरोधी टूल बनवल्याचा दावा केला जातो मात्र ते किती उपयोगात येतात हे खात्रीलायक सांगता येत नाही. त्यामुळे रॅन्समवेअरचा प्रादुर्भाव होऊ देऊ नये हा सर्वात मुखू सुरक्षेचा उपाय.

 

प्रादुर्भाव होऊ नये ह्याकरिता काय कराल?

 • अज्ञात स्रोतांवरून आलेले इमेल उघडू नका आणि त्यातील जोडणी Attachments कितीही आकर्षक वाटली तरी ती डाउनलोड करू नका.
 • सोशल मिडिया वरून सध्या वेगाने पसरणारे रॅन्समवेअर आपल्या फेसबुक अथवा लिंक्डइन मधील मेसेज द्वारे अपोआप डाउनलोड होत आहेत. आपल्या मित्र अथवा अज्ञात व्यक्तीच्या नावे एक चित्र (Image) आपल्याला मेसेज द्वारे प्राप्त होऊन ते संगणक अथवा मोबाईल वर आपोआप डाउनलोड होते. ते चित्र उघडताच हा रॅन्समवेअर आपल्या संगणकावर काम सुरु करतो. म्हणून अशा चित्रांपासून लांबच राहिलेले बरे.
 • Cracked Softwares आणि Keygens इत्यादी साहित्य वापरण्याअगोदर विचार करा.
 • ReDirection अर्थात एक वेबसाईट उघडत असताना अपोआप इतर जाहिरातींनी भरलेल्या अथवा काही आकर्षक साहित्याने भरलेल्या वेबसाईट उघडत असल्यास त्या तत्काळ बंद करून टाका. ह्याकरिता मोफत AdblockPlus सारख्या सोप्या साधनाची मदत तुम्ही घेऊ शकता.
 • अज्ञात दुवे (लिंक) सोबत घेऊन येणारे whatsapp आणि एसएमएस द्वारे येणारे मेसेज मधील लिंकवर क्लिक करू नका तसेच त्यांना पुढे पाठवू नका. सध्या अशा व्हायरस ने भरलेल्या मेसेजेस नी धुमाकूळ घातला आहे.

ह्या नवीनच आलेल्या आणि अनेकांना त्रस्त करून सोडलेल्या रॅन्समवेअर व्हायरसची थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न मी केला आहे. ह्याउपर संगणक आणि संगणक सुरक्षेविषयी काही प्रश्न असल्यास त्यांचे स्वागत ब्लॉग वरील टिपणी (Comments) द्वारे आहेच.

The post रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0/feed/ 1 223
फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa/ http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa/#respond Sun, 13 Mar 2016 16:05:30 +0000 http://ashutoshblog.in/?p=166 The post फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… appeared first on आशुतोष.

फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… गेल्या काही दिवसात फेसबुक ग्रुप येणाऱ्या पहावल्या न जाणाऱ्या अश्लील पोस्ट्स बद्दल सातत्याने तक्रारी येत आहेत,अचानक कुठूनतरी टोळधाड यावी अन सर्वांना त्रस्त करून सोडावं तसं ह्या पोस्ट्स नी सगळ्या ग्रुप्स वर उच्छाद मांडून ठेवला आहे. अगदी सज्जन वृत्तीच्या,समाजात चांगलं स्थान असलेल्या व्यक्तींच्या फेसबुक खात्यावरून सुद्धा अनेकदा अशा पोस्ट […]

The post फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… appeared first on आशुतोष.

]]>
The post फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… appeared first on आशुतोष.

फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल…

गेल्या काही दिवसात फेसबुक ग्रुप येणाऱ्या पहावल्या न जाणाऱ्या अश्लील पोस्ट्स बद्दल सातत्याने तक्रारी येत आहेत,अचानक कुठूनतरी टोळधाड यावी अन सर्वांना त्रस्त करून सोडावं तसं ह्या पोस्ट्स नी सगळ्या ग्रुप्स वर उच्छाद मांडून ठेवला आहे. अगदी सज्जन वृत्तीच्या,समाजात चांगलं स्थान असलेल्या व्यक्तींच्या फेसबुक खात्यावरून सुद्धा अनेकदा अशा पोस्ट पडत आहेत,त्यावरून त्या व्यक्तींची नाहक बदनामी होत असली तरी मुद्दाम कुणी हे असे करत नाही,हे सर्व कारस्थान काही व्हायरस मुळे होते आहे.त्यामुळे अशा पोस्ट ज्यांच्या खात्यावरून होत आहेत त्या तुमच्या मित्रांवर उगीच संशय न घेता हे असे का होते ह्याची माहिती करून घ्या.

खरे पाहता अशा पोस्ट्स ची तक्रार वारंवार ग्रुप संचालक (Admin) आणि फेसबुक कडे केली जाते,ग्रुप संचालक फारफार तर त्या पोस्ट्स डिलिट करू शकतात पण फेसबुक देखील ह्या व्हायरस पुढे आता हतबल झालेला दिसत आहे.कारण मुळात हे व्हायरस फेसबुक च्या बाहेर चाललेल्या काही मालवेअर मुळे पसरत आहेत.आपण सुरक्षित पणे फेसबुक आणि आपला संगणक हाताळल्यास,अद्ययावत अॅण्टी व्हायरस वापरल्यास ह्या व्हायरस पासून आपण सहज सुरक्षित राहू शकतो.

हे व्हायरस कसे काम करतात? आणि अशा पोस्ट्स का पडतात?

अशा पोस्ट जेव्हाही येतात,तेव्हा त्या सोबत एक लिंक त्या पोस्ट खाली येते, बरेचवेळा हे काय प्रकार आहे म्हणून आपण त्या लिंक वर क्लिक करतो, बहुतेक वेळा ह्या लघुरुपात अर्थात Shortned URL (जसे की bit.ly,ow.ly ई.) त्यामुळे ह्या लिंक्स च्या मागे लपलेल्या वेबसाईट आपल्याला दिसत नाहीत. ह्या shortned URL चे कामच मुळात वेबसाईट ला झाकून लघुरुपात प्रसिद्ध करण्याचे असते जेणेकरून त्या सोशल मिडीयावर वेगाने पसरवता येतात, अर्थात सगळ्याच लघुरुपात आलेल्या लिंक्स ह्या व्हायरस नसतात तर त्यातल्या काहीच लिंक्स ह्या व्हायरस चा प्रादुर्भाव करणाऱ्या पेजेस न forward करतात.

एकदा का ह्या लिंक वर एखाद्याने क्लिक केलं की,आपण कुठल्यातरी वेबसाईट वर जाऊन पोहोचतो,त्या वेबसाईट मुळात ह्या व्हायरस पसरवण्याच काम करत असतात. काही वेबसाईट न भेट दिली की लागलीच आपल्या खात्यावरून त्या वेबसाईट ची लिंक अश्लील फोटोंसह सगळ्या ग्रुप्सवर अपोआप पोस्ट होते,ह्यात आपली browser मध्ये आपल्याला न कळत काही स्क्रिप्ट आपल्या संगणकावर रन होतात अन त्यांचे काम करतात.
काही वेबसाईट ह्या सरळ सरळ स्क्रिप्ट रन न करता त्या वेबसाईट वरून काहीतरी सोफ्टवेअर अथवा browser plugin डाउनलोड करण्याचे सुचवतात,ते सोफ्टवेअर डाउनलोड करून आपण इंस्टाल केले की तत्काळ हा व्हायरस आपल्या फेसबुक वर लिंक्स पोस्ट करू शकतो.
प्रत्येक वेळी अशा लिंक्स क्लिक करूनच हा व्हायरस आपल्या घरात पोचेल असे नाही, कधीकधी फेसबुक न वापरता,इतर अनोळखी ठिकाणावरून गाणी,सोफ्टवेअर डाउनलोड केल्यानेही हा व्हायरस संगणकात मालवेअर रुपात पोहोचू शकतो,अन असे काही होणे शक्य आहे.कारण हे मालवेअर बरेचदा आपल्या संगणकात अपोआप browser मधून वेबसाईट उघडून स्क्रिप्ट रन करतात.त्यामुळे फेसबुकच नव्हे इतर वेळी देखी खबरदारी घेणे आवश्यक असते.

ह्या पासून कसे सुरक्षित रहावे.?

१.ह्या पासून सुरक्षित राहण्याचा पहिला उपाय म्हणजे फेसबुक वर आलेल्या अशा पोस्ट्स आणि लिंक्स अजिबात न उघडून पाहणे.कारण ९०% वेळा हे प्रकार त्यातूनच घडतात. अशा पोस्ट्स दिसताच त्यांना ग्रुप संचालकांना आणि फेसबुक कडे रिपोर्ट करावे,जेणे करून त्या पोस्ट्स हटवल्या जातील.

२.आपल्या फेसबुक खात्यावरून आपण जे काही apps आणि games वापरतो त्यांची यादी फेसबुक च्या settings मध्ये असते ती व्यवस्थित तपासून त्यातील नको असलेले apps त्वरित काढून टाकावेत.

३.आपल्या web browser ला जोडलेलं गरज नसलेले Extensions/plugins/add-ons काढून टाका.बहुतेक वेळा हे extensions म्हणजे व्हायरस चं दुकान बनतात.

४.कुठल्याही वेबसाईट वरून नवीन सोफ्टवेअर अथवा गाणी फोटो इत्यादी डाउनलोड करण्याआधी ते विश्वासू असल्याची खात्री करून घ्या.अज्ञात संकेतस्थळावरून काहीही डाउनलोड करणे धोक्याचे असते.

५.तुम्ही विंडोज संगणक वापरत असाल तर एक चांगला अॅण्टी व्हायरस वापरण्यास सुरुवात करणे अत्यावश्यक आहे.केवळ इंस्टाल करून नव्हे त्याला अद्ययावत (Updated) ठेवणे आवश्यक आहे.कारण केवळ हेच नव्हे,ह्यापेक्षाही भयंकर असे व्हायरस विंडोज संगणकाला सहज बाधित करतात.

माझ्या खात्यावरून अशा पोस्ट गेल्या आहेत,माझे खाते HACK झाले आहे का? मी काय करू?

अशा पोस्ट तुमच्या खात्यावरून झाल्या असतील तर तुमचे खाते hack झाले असण्याची शक्यता अगदीच नगण्य,तरीही भीती वाटत असल्यास आपण आपला फेसबुक आणि इमेल चा पासवर्ड बदलून टाका.सोबतच अशा लिंक्स जिथे कुठे पोस्ट झाल्या आहेत त्या तिथून स्वतःच डिलिट करा अन अशा पोस्ट्स वर इतरांनी क्लिक करून नये ह्याची सुचना तत्काळ मित्रांना द्या.

मित्रांनो,या संगणकाच्या युगात असे अनेक प्रकारचे व्हायरस हल्ले नेहमीच होत राहणार ह्यात शंका नाही,कारण अगदी थोडक्यात लाखो लोकांना बाधा पोहचवण्याचा हा सहज सोपा मार्ग आहे. त्यामुळे आपणच योग्य मार्गाने संगणक वापरून स्वतःला सुरक्षित ठेवणे जास्त आवश्यक आहे.हा लेख तुम्ही इतरांना देऊन त्यांनाही अशा व्हायरस पासून सुरक्षित राहण्याचे कळवू शकता,कारण आपली सुरक्षा आपल्या हातात आहे.
अशा प्रकारच्या संगणक अथवा तंत्रज्ञान निगडीत प्रश्न असल्यास मला माझ्या ब्लॉग द्वारे संपर्क करू शकता.

The post फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa/feed/ 0 166
मोफत ब्लॉग – blogger की wordpress http://ashutoshblog.in/technology/wordpress-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-blogger%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87/ http://ashutoshblog.in/technology/wordpress-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-blogger%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87/#comments Sat, 16 Jan 2016 16:45:46 +0000 http://ashutoshblog.in/?p=153 The post मोफत ब्लॉग – blogger की wordpress appeared first on आशुतोष.

संगणक क्षेत्रात युनिकोडचे आगमन होताच भारतीय भाषांना देखील संगणकीय सोपे रूप प्राप्त झाले.कधीकाळी महादिव्य अशा कसोट्या पार करत संगणकावर मराठी लेखन करावे लागत असे जे की आता अत्यंत सोपे काम झाले आहे.वाऱ्यावरती लिहावे तसे वेगाने मराठी अक्षरे संगणकाच्या पडद्यावर उमटवणे आता सहज शक्य झाले.किंबहुना बहुसंख्य आधुनिक मराठी प्रेमी युवा पिढीने ते सहजगत्या अवगत देखील केले […]

The post मोफत ब्लॉग – blogger की wordpress appeared first on आशुतोष.

]]>
The post मोफत ब्लॉग – blogger की wordpress appeared first on आशुतोष.

संगणक क्षेत्रात युनिकोडचे आगमन होताच भारतीय भाषांना देखील संगणकीय सोपे रूप प्राप्त झाले.कधीकाळी महादिव्य अशा कसोट्या पार करत संगणकावर मराठी लेखन करावे लागत असे जे की आता अत्यंत सोपे काम झाले आहे.वाऱ्यावरती लिहावे तसे वेगाने मराठी अक्षरे संगणकाच्या पडद्यावर उमटवणे आता सहज शक्य झाले.किंबहुना बहुसंख्य आधुनिक मराठी प्रेमी युवा पिढीने ते सहजगत्या अवगत देखील केले आहे.आणि यातून अधिक एक नवे व्यासपीठ खुले होते ते म्हणजे आधुनिक साहित्याचे.

नव्या पिढीच्या लेखकांना व्यक्त होण्यासाठी सहज सोपे साधन म्हणजे ब्लॉग्स.अगदी घरी बसल्या हजारो वाचकांपर्यंत आपले विचार अन लेखन पोचवणे ते हि अगदी मोफत किंवा अत्यल्प खर्चात आता सहज शक्य आहे.ब्लॉग्स चे विश्व खुले होताच अनेकानेक लेखकांनी त्याची मदत घेत आपले विविध ब्लॉग सुरु करून मराठी लेखनाला प्रसिद्धी दिली आहे.

याउपर आजही अनेक लेखक आपले ब्लॉग्स सुरु करण्याच्या विचारात आहेत,त्यांच्या करीतच हा लेख.या लेखातून मोफत ब्लॉग सुरु करण्याचे दोन उत्तम पर्याय यांच्याबद्दल मी लिहित आहे.हे दोनही पर्याय ब्लॉगिंग ची सुरुवात म्हणून अत्यंत उत्तम आहेत,पण आपली वाटचाल केवळ ह्याच मोफत पर्यायांवर होत राहणे सोयीचे नाही,जसजसी वाचक संख्या वाढेल तसे आपण हे मोफत आणि कमी सोयी उपलब्ध असलेले पर्याय सोडून अधिक मोठ्या पर्यायांकडे जाने आवश्यक आहे.

यात मी blogger आणि wordpress.com (wordpress.org नव्हे) ह्या दोन्हीही मोफत पर्यायांची माहिती देणार आहे.

 

blogger आणि wordpress बद्दल थोडक्यात:

blogger.com आणि wordpress.com हे दोनही मोफत ब्लॉग सुरु करण्याची सोय उपलब्ध करून देतात.आणि या दोन्ही ठिकाणी मोफत स्वरुपात एक सब-डोमेन स्वरुपात आपला ब्लॉग आपण सुरु करू शकतो.सब डोमेन म्हणजे  ashutoshblog.wordpress.com किंवा ashutosh.blogspot.com अशा स्वरूपाचे,यात आपण निवडलेल्या ब्लॉग च्या नावापुढे ज्याचे सोय आपण वापरतो त्याचे डोमेन नेम लावले जाते.त्यामुळे केवळ आपले डोमेन असलेला आपला ब्लॉग यात असत नाही.

याच दोहों प्रमाणे अनेक सोयी उपलब्ध आहेत मात्र काही कारणांमुळे त्या फारश्या लोकप्रिय झाल्या नाहीत.म्हणून मी केवळ wordpress.com आणि blogger.com ह्यांबद्दल लिहित आहे.

blogger किंवा wordpress यांच्या वेबसाईट वर जाऊन मोफत नोंदणी करून काही क्षणात आपण आपला  ब्लॉग कार्यान्वित करू शकता,त्याकरिता केवळ प्राथमिक नोंदणी आवश्यक असते अन कसलेही पैसे देण्याची गरज असत नाही.

यापैकी blogger.com हे संपूर्णपणे मोफत आणि गुगल च्या मालकीचे साधन आहे.तर wordpress.com हे एक लोकप्रिय सी.एम.एस. अर्थात Content Management System वापरून तयार केलेलं साधन आहे.जे wordpress.org वरून मोफत डाउनलोड करून आपणही स्वतःचा अत्याधिक वैशिष्ट्य युक्त ब्लॉग तयार करू शकतो.

हा माझा ब्लॉग ashutoshblog.in हा देखील हेच CMS वापरून निर्माण केलेला आहे.

 

blogger की wordpress?

मुळात पाहता यावर blogger किंवा wordpress असे नेमके एकच उत्तर देणे तसे थोडे अवघडच आहे.नेमकी कोणती सुविधा वापरायची हे पूर्णतः आपण ब्लॉग कशावर आणि का तयार करीत आहोत ह्यावर ठरते.

आपण केवळ साधा लिखित स्वरूपाचा, केवळ हौस म्हणून ब्लॉग बनवणार असू जिथे विचार व्यक्त करायचे आहेत अन ब्लॉग च्या दिसण्याला फारसे महत्व नाही अशा ब्लॉगर्स नि blogger.com च्या सोप्या पर्यायाचा विचार घ्यावा.कारण blogger.com चे ब्लॉग्स हे थोड्या फार प्रमाणात एकसारखेच असतात अन पाहता क्षणी हा ब्लॉग blogger द्वारे बनवला असल्याचे सहज लक्षात येते.यात ब्लॉग चे रंगरूप बदलण्याचे फार थोडे पर्याय उपलब्ध असतात.त्यामुळे ज्यांना ब्लॉगच्या डिजाईन ने फरक पडत नाही अशांनीच blogger.com चा पर्याय स्वीकारावा.

याउलट काही हौशी छायाचित्रकार मात्र blogger.com च्या जुन्या ब्लॉग सारख्या रुपाला स्वीकारू शकत नाहीत,त्यांना आपल्या फोटो चे सादरीकरण देखील सुंदर पद्धतीने व्हावे असे वाटणे शक्य आहे. त्यामुळे ज्या ब्लॉगर्स न आपल्या ब्लॉग च्या डिजाईन वर देखील भर द्यायचा आहे अशांनी मात्र blogger.com ऐवजी wordpress.com चा आधार घेणे जास्त उपयुक्त ठरते. तसे पाहता wordpress.com वर देखील Customization फारसे उपलब्ध नाही,त्या सर्व सोयी ह्या wordpress.org द्वारा आहेत,पण ते जरासे खर्चिक अन तांत्रिकदृष्ट्या किचकट कार्य आहे.त्यामुळे छायाचित्रकार,चित्रकार,कुठल्याही प्रकारचे कलाकार ह्यांनी wordpress.com चा पर्याय वापरावा असे माझे मत आहे.

 

हे झाले थोडक्यात wordpress आणि blogger बद्दल, आता जरा खोलात दोन्ही सुविधांची माहिती मी लिहितो.

 

१. blogger.com (किंवा blogspot.com)

सुरुवात करायला अत्यंत सोपे अन कसलेही तांत्रिक ज्ञान नसताना केवळ ई-मेल हाताळावे इतके सोपे असलेली हि सुविधा,मात्र अत्यंत कमी सोयींची उपलब्धता यांमुळे हे जरासे जुनाट वळणाचे,फारसे व्यावसायिक वाटत नाही.तरीही ब्लॉग लिहिण्याची सुरुवात म्हणून हाच पर्याय उत्तम ठरतो.

 

वैशिष्ट्ये:

१.कसलेही पैसे न देता,सर्वच सोयी अगदी मोफत तेही कुठल्याही जाहिराती विना.

२.एखादा ई-मेल लिहावा तसे काही मिनिटांत आपला ब्लॉग सुरु करण्याची सोय.

३.ब्लॉग आपोआप गुगल सर्च ला इंडेक्स होतो.

४.ब्लॉग च्या backup आणि सुरक्षिततेची कसलीच काळजी नाही,सर्व काही आपोआपच होते.

५.काही प्रमाणात Customization.

६.आपला स्वतःचा डोमेन अगदी मोफत blogger ला जोडता येऊ शकतो.

७.अमर्याद संख्येने फोटो विडीयो सादर करण्याची सोय.

 

उणीवा:

१.ब्लॉग लिंक्स चे structure बदलण्याची सोय नाही,जे कि SEO सर्च इंजिन ला दिसण्याकरिता आवश्यक असते.

२.उपलब्ध themes ची अत्यंत कमी संख्या.त्यामुळे ब्लॉग चा चेहेरा मोहरा फारसा बदलणे अवघड जाते.

३.सर्वात महत्वाचे,तांत्रिकदृष्ट्या तुमच्या ब्लॉग ची संपूर्ण मालकी तुमच्या कडे राहत नाही,ती राहते गुगल कडे.अगदी क्षुल्लक कारणांवरून गुगल तुमचा ब्लॉग कसल्याही सुचनेविना कधीही बंद करू शकतो.यापूर्वी माझा मोफत सोफ्टवेअर बद्दलचा ब्लॉग देखील अशाच पद्धतीने बंद करून टाकला होता.

४.मुख्य गोष्ट, गुगल ने हि सुविधा गेल्या कित्येक वर्षांत कधीही अपडेट केलेली नाही.किंवा त्याच्या भविष्यातील योजनांची माहिती दिलेली नाही.त्यामुळे या सुविधेवर विश्वास ठेवणे म्हणजे जुगार ठरू शकतो.

 

२.wordpress.com

समजण्यास थोडे अवघड वाटत असले तरी एकदा जाणून घेतल्यावर याच्या इतके सोयीस्कर असे दुसरे ब्लॉग साधन नाही.उलटपक्षी जास्त customization असल्याने आपला ब्लॉग अधिकाधिक सोयीयुक्त व सुंदर होत जाणार आहे.

 

वैशिष्ट्ये:

१.अमर्याद मोफत.

२.सुरक्षा,backup इत्यादींची काळजी नाही.

३.ब्लॉग च्या सुविधा वाढवण्याची सोय.

४.सध्याचे डोमेन वापरण्याची सोय ($१३ )

५.मोफत थीम ऐवजी जास्त सोयींयुक्त थीम्स विकत घेऊन वापरता येण्याची सोय.

उणीवा:

१.तुमच्या ब्लॉग वर जाहिराती दाखवल्या जाण्याची शक्यता.

२.थर्ड पार्टी प्लगइन्स वापरता येत नाहीत.

३.आपल्याला हवे तसे कोड सामावून घेता येत नाहीत.

४.अत्यंत कमी स्टोरेज, केवळ ३ जीबी.

 

थोडक्यात मोफत ब्लॉग सुरु करण्यात आपल्या गरजेनुसार सुविधा निवडणे आवश्यक आहे.ह्या लेखातून सर्वच गोष्टी मांडणे शक्य झालेले नाही,पण अत्यंत थोडक्यात त्या सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.याउपर मराठी लेखकांना आपला ब्लॉग सुरु करण्यात अडचणी असल्यास किंवा त्याबद्दल कसलेही मार्गदर्शन हवे असल्यास केवळ मराठी लेखकांना मी मोफत देऊ करीत आहे.त्याकरिता आपण मला ब्लॉग द्वारे संपर्क करू शकता.

The post मोफत ब्लॉग – blogger की wordpress appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/technology/wordpress-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-blogger%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87/feed/ 2 153
मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#comments Sun, 10 Jan 2016 02:59:00 +0000 http://ashutoshblog.in/?p=121 The post मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन appeared first on आशुतोष.

शिवकाळात या महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या भूमीला लाभेलेले थोर संत रामदास वर्तमान अन भविष्याचा वेध घेत आपल्या श्लोकातून म्हणतात “आहे तेवढे जतन करावे | पुढे आणिक मेळवावे | महाराष्ट्र राज्य करावे | जिकडे तिकडे || “   याच संतभूमीची शिकवण घेऊन वाढलेले आजचे आधुनिक मराठी जन,महाराष्ट्राच्या माय मराठी ची पताका सर्वदूर करण्यास अजून एकदा सिद्ध जाहले […]

The post मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन appeared first on आशुतोष.

]]>
The post मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन appeared first on आशुतोष.

शिवकाळात या महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या भूमीला लाभेलेले थोर संत रामदास वर्तमान अन भविष्याचा वेध घेत आपल्या श्लोकातून म्हणतात

“आहे तेवढे जतन करावे | पुढे आणिक मेळवावे |

महाराष्ट्र राज्य करावे | जिकडे तिकडे || “

 

याच संतभूमीची शिकवण घेऊन वाढलेले आजचे आधुनिक मराठी जन,महाराष्ट्राच्या माय मराठी ची पताका सर्वदूर करण्यास अजून एकदा सिद्ध जाहले आहेत.

अमृतातेही पैजा जिंकणारी आपली माय मराठी ही संगणक युगात आपला डिजिटल ठसा उमटवल्या वाचून राहणे शक्य नाही.अन हीच डिजिटल पताका घेऊन ती सर्वदूर करण्यास निघाली आहेत मराठी नेटकर मंडळी.फेसबुक अन ट्विटर च्या काळात मराठीचा डंका जोरदार पिटणारा अन विश्वाला आपल्या मराठीची ओळख देऊन या संतांच्या भाषेचे संवर्धन वृद्धिंगत करणारा एक अनोखा उपक्रम होणार आहे.

येत्या १५ जानेवारी पासून पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सालाबाद प्रमाणे साजरे होईलच पण हीच संधी साधून याच साहित्य संमेलनासारखे एक डिजिटल संमेलन यावर्षी ट्विटर वर होणार आहे.ट्विटरवरची मराठी मंडळी आणि @MarathiWord यांच्या पुढाकाराने एक छोटेखानी वाटणारे पण मुळात संपूर्ण सोशल विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकेल असे हे संमेलन.

या संमेलनात होणार काय? तर #ट्विटरसंमेलन हा हॅशटॅग वापरून ट्विटरजन विविध साहित्य ट्विटर वर प्रकाशित करतील.

आजच्या धावपळीच्या युगात आपली लेखनाची,विचार मांडण्याची,कविता करण्याची,कथा सांगण्याची,प्रवासवर्णनं लिहिण्याची हौस फेसबुक भिंती,ब्लॉग्स,ट्विटर च्या माध्यमातून पुरी करताना,लिहिताना,व्यक्त होताना दिसतात.आता हेच आधुनिक साहित्यिक हे अनोखे आधुनिक साहित्य संमेलन ट्विट द्वारे भरवणार आहेत.

आधुनिक साहित्याचे १२ प्रकार अन त्या प्रत्येक प्रकाराचे १२ हॅशटॅग निर्माण केले आहेत.आपल्या साहित्याच्या प्रकारानुसार योग्य तो हॅशटॅग तसेच #ट्विटरसंमेलन हा मुख्य हॅशटॅग १५ ते १८ जानेवारी २०१६ दरम्यान वापरून कोणीही नेटकर या संमेलनात सहभागी होऊ शकतो.

या करिता आपण पूर्वी लिहिलेले ब्लॉग्स,कथा,विचार,कविता,प्रवासवर्णन ई. किंवा चालू काळात लिहित असलेले असे कुठलेही मराठी साहित्य किंवा त्याच्या लिंक्स तुम्ही ट्विट करू शकता.  

हे बारा हॅशटॅग पुढीलप्रमाणे

 

1) #माझीकविता :

तुम्ही कविता,चारोळ्या,गाणी,ओव्या,भजन,मराठी गझला लिहता ? मग #माझीकविता वापरून आपण आपल्या कविता हजारो लोकांपर्यंत एका क्षणात पोहचवू शकता.कवितेचे शक्यतो छायाचित्र पाठवावे,वाचण्यास सोपे जाईल(कविता मोठी असेल तर).

 

2) #माझीकथा :

तुम्ही कथा लिहली आहे ? किंवा लिहू शकता ? तर वापरा #माझीकथा आणि आपल्या कथा आमच्यापर्यंत पोहचवा.आपण खुद्द ट्विटरवर पन्नास ते शंभर ट्विट्स मध्ये कथा लिहू शकता.हा नक्कीच एक वेगळा अनुभव असेल.

 

3) #माझाब्लाॅग :

तुम्ही ब्लाॅग लिहले आहेत ? किंवा लिहू शकता ? तुमच्या ब्लाॅग बद्दल आम्हाला कळवा #माझाब्लाॅग वापरून.

तुमच्याकडे ब्लाॅग नसेल तर नक्की बनवा.

 

4) #माझेविचार :

तुमचे मराठी साहित्य आणि भाषेबद्दलचे विचार आपण मुक्तपणे इथे नोंदवू शकता. संमेलनाद्वारे निवडलेल्या विषयांवर आपण आपले मत नोंदवू शकता.

 

5) #माझीबोलीभाषा

आपल्या बोलीभाषेबद्दल आपल्याला अभिमान आहे ? इतरांना तिची महती सांगायला आवडेल ? मग ती कोणतीही असो कोकणी,अहिरणी,

व-हाडी इत्यादी.त्या बोलीभाषेतील गाणी,शब्द,

ओव्या,म्हणी आणि बाकी सगळं आम्हाला सांगु शकता #माझीबोलीभाषा द्वारे.

 

6) #साहित्यसंमेलन

पिंपरी चिंचवड मध्ये भरणा-या अ.भा साहित्य संमेलनाबद्दलचे विचार आपण #साहित्यसंमेलन टॅग वापरून नोंदवू शकता.

 

7) #पुस्तकपरिचय :

आपल्याकडे संग्रही असणारे,आपण वाचलेली किंवा वाचणार आहात अशा पुस्तकांची ओळख आपण #पुस्तकपरिचय टॅग वापरून देऊ शकता.

याद्वारे बरीच मराठी पुस्तके पुन्हा चर्चेत येऊ शकतील.

 

8) #लेखकपरिचय :

आपल्या आवडत्या लेखकाबद्दल आपण #लेखकपरिचय टॅग वापरून त्यांची ग्रंथसंपदा,कार्यकाळ इ.माहिती देऊ शकता.मराठीच्या या थोरांची महती सर्वांना कळणे गरजेचे आहे.

 

9) #सध्यावाचतोय :

तुम्ही सध्या काय वाचताय ? सांगा आम्हाला #सध्यावाचतोय हा टॅग वापरून. तुम्ही त्या पुस्तकाची समिक्षा इथे ट्विट करू शकता.

 

10) #सलामपाडगांवकर :

कविवर्य मंगेश पाडगांवकर यांना आपण #ट्विटरसंमेलन मध्ये श्रद्धांजली वाहणार आहोत. आपल्या या लाडक्या कवी आजोबाबद्दल आपण आपले विचार मांडू शकता #सलामपाडगांवकर वापरून.

 

11) #हायटेक_मराठी:

मराठी भाषेसाठी निर्माण झालेले अॅप,संकेतस्थळे,तंत्रज्ञानावरची पुस्तके,ब्लाॅग्स इ. बद्दल आपण #हायटेक_मराठी वापरून चर्चा करू शकता.मराठीला तंत्रज्ञानाची भाषा बनवू

पाहणा-या प्रत्येक धडपडीचे आपण कौतुक करूया.

 

12 ) #मराठी_विश्वकोश_दर्शन

आपण या संमेलनादरम्याण मद्दाम marathivishwakosh.in ला भेट देऊन,

आवडलेल्या नोंदी #मराठी_विश्वकोश_दर्शन टॅग वापरून इतरांना सांगणार आहोत, ज्ञानाचे हे भंडार आपण आता उघडून त्याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. चला विश्वकोशाचे हे “विश्वरूप” अनुभवूया.

या सोबतच eboo.co.in यांच्यातर्फे अगदी विनामुल्य खालील उपक्रम राबवण्यात येत आहेत. अशाप्रकारे सर्वच जण काहीना काही मार्गाने मराठी वृद्धिंगत करण्यासाठी हातभार लावत आहेत.

1) सादर करण्यात आलेल्या उत्तम कवितांचे, कथांचे ईपुस्तक प्रकाशित केले जाणार आहे,

2) कविता व कथा कथन विडिओ स्वरूपात सादर करता येणार आहे

3) त्याचे प्रक्षेपण EBOOच्या youtube वाहिनी वर करता येणार आहे जेणे करून एकाच ठिकाणी सगळे व्हिडिओ उपलब्ध होणार आहेत.

हे सर्व साहित्य मराठी भाषेतूनच असणे आवश्यक आहे.

चला तर नेटकर मंडळी,अटकेपार झेंडे रोवणाऱ्या आपल्या इतिहासाची शान आणखी वाढवूया,ही मराठी पताका,महाराष्ट्र ध्वज जगभर नेऊया.

कारण,लक्षात घ्या,ह्या प्रकारचं संमेलन किंवा असा उपक्रम यापूर्वी जगात कोणत्याही भाषेत,कुठेही झाल्याचे ऐकिवात नाही,अगदी इंग्रजी भाषेत देखील असे एखादे कार्य या आधुनिक नव्या युगाच्या मंचावर झालेलं नाही,आपल्या माय मराठी चा हा मान पहिला असणार आहे.

सोशल मिडीयाच्या इतिहासात मराठीचं नाव विश्वरूपी अग्रेसर करणारा हा उपक्रम होत आहे,त्यात सहभागी होत असलेल्या प्रत्येकच मराठी मावळ्याला शुभेच्छा.आपण माझेही ट्विट शेजारील ट्विटर बॉक्स मध्ये पाहू शकताच किंवा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ट्विटर वर मला येथे @ashutoshab फॉलो करू शकता 

 

(माहिती स्रोत आभार – @MarathiWord)

The post मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 3 121
ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी http://ashutoshblog.in/technology/atm-card-hack/ http://ashutoshblog.in/technology/atm-card-hack/#respond Fri, 17 Oct 2014 08:00:44 +0000 http://ashutoshblog.in/?p=15 The post ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी appeared first on आशुतोष.

ATM FRAUD(FAKE INQUIRY CALLS) काल दुपारी अचानक एका अनोळखी number वरून फोन आला.उचलला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण “भारतीय रिझर्व बँकेतून” बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या ATM कार्ड चे Verification करण्याकरिता संपर्क केल्याचे तो सांगत होता.त्याने संपर्क केलेला क्रमांक, त्याला माझ्याबद्दल नसलेली माहिती ह्या वरून मला त्या व्यक्तीवर संशय आला व मी त्याला खोलात जाऊन […]

The post ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी appeared first on आशुतोष.

]]>
The post ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी appeared first on आशुतोष.

ATM FRAUD(FAKE INQUIRY CALLS)
काल दुपारी अचानक एका अनोळखी number वरून फोन आला.उचलला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण “भारतीय रिझर्व बँकेतून” बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या ATM कार्ड चे Verification करण्याकरिता संपर्क केल्याचे तो सांगत होता.त्याने संपर्क केलेला क्रमांक, त्याला माझ्याबद्दल नसलेली माहिती ह्या वरून मला त्या व्यक्तीवर संशय आला व मी त्याला खोलात जाऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली.त्याने बरीच उडवा उडवीची उत्तरे देत शेवटी ‘तुमचेच ATM CARD ब्लॉक होईल मला काय त्याचे’ म्हणत फोन ठेवला.मी ह्या बाबतीत लगेच बँकेत चौकशी केली असता अशा प्रकारे कुठलेही Verification केले जात नसल्याचे कळाले.
हे सांगण्याचा उद्देश, आपणा सर्वाना एका नवीन धोक्याची ओळख करून देणे.मी ह्या पूर्वी लिहिलेल्या ‘Whatsapp साठी फेसबुक वर number देण्यातले धोके’ ह्या पोस्टचा पुढचा टप्पा म्हणजे हे Fraud. शक्य तितक्या सोप्या भाषेत आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.
सर्वात प्रथम हे online भामटे काहीतरी मार्गाने तुमचा संपर्क क्रमांक मिळवतात,जमलेच तर तुमच्या बद्दल थोडीफार माहिती,जसे की,तुमचे नाव,राहते ठिकाण,तुमचा व्यवसाय इ. माहिती सुद्धा जमवतात.एकदा का तुमचा संपर्क क्रमांक मिळाला कि हे भामटे तुम्हाला संपर्क करतात आणि काही बाही खोटे बोलून ते कुठलेतरी अधिकारी असल्याचे भासवतात. ह्यात वर म्हटल्या प्रमाणे कुठल्यातरी बँकेचा अधिकारी किंवा बरेचदा तुमच्या मोबाईल नेटवर्क कंपनी चा अधिकारी असल्याचे सांगत तुम्हाला माहिती विचारतात.
१. हे लोक तुमचा विश्वास बसावा ह्या करिता तुमची साधारण सर्वज्ञात माहिती तुम्हालाच सांगून भुलवण्याचा प्रयत्न करतात.ज्याद्वारे तुमचा त्यांच्यावर विश्वास बसू शकतो.
२. हे तुमच्या ATM / CREDIT कार्ड ची माहिती, बँक खात्याची माहिती, Online खर्चाची माहिती इ. बद्दल विचारातील.कुठल्यातरी गोष्टीचा संदर्भ देत नेमकी हीच गोपनीय माहिती तुमच्या कडून काढून घेण्याचा ते प्रयत्न करतील.
३.कसली तरी तपासणी (Verification) आहे,कोणतीतरी सुविधा मोफत सुरु करायची आहे असे सांगत तुमचे मन त्या खोट्या गोष्टीकडे आकर्षित करण्याचा ते प्रयत्न करतील.
४. तुम्ही ऐकलेच नाहीत तर ‘तुमचे ATM कार्ड बंद होईल किंवा तुम्हाला Online Banking करता येणार नाही’ अशी काहीतरी खोटी भीती तुम्हाला दाखवून तुमच्या कडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतील.

थोडक्यात काहीतरी कारण सांगून खोटे बोलून तुमच्या कडून तुमच्या ATM / CREDIT कार्ड, बँक खाते इत्यादीची माहिती काढून घेण्याचा हा प्रकार. पण हे सगळं करण्यात ह्या भामट्यांचा उद्देश्य काय असावा?
१. हि माहिती देताना ते तुमच्या कडून अर्थात प्रयत्न करतीलच कि तुमचा ATM PIN किंवा PASSWORD काढून घ्यावा. काही लोक सांगतात देखील, ज्यांनी सांगितला त्यांचे पैसे तर गेलेच म्हणून समजा.
२. ते तुमच्या ह्या माहिती सोबतच इतर माहिती देखील विचारू शकतात. उदा. तुमच्या वाहनाचा क्रमांक,तुमच्या पती/पत्नी/मुले/आई/वडील इत्यादींची नावे,तुमचा पत्ता,तुमचे छंद इ. बरेचदा आपण ह्याच गोष्टीना आपला ‘password’ म्हणून वापर करतो, हा एक धोका.
३. प्रत्येक वेळेस असे calls हे तुमचे account HACK करण्या करिताच असतात असे नाही, बरेचदा हे लोक मार्केट सर्वे करिता देखील संपर्क करितात. असे संपर्क करून मिळवलेली हि माहिती पुढे बरीच उपयोगात येते.
४. तुम्हाला कसली तरी lottery लागली आहे,किंवा बक्षीस मिळाले आहे त्याकरिता transfer फी म्हणून कंपनीकडे काही हजार जमा करा म्हणत तुम्हाला त्यांच्या बँक account ला पैसे जमा करण्यास सांगतील. (हि युक्ती मुख्यत्वे नायजेरियन भामटे वापरतात) आणि तुम्ही बक्षिसाच्या आमिषाने पैसे जमा करताच ते परागंदा होतात.

ह्या सर्वांवरच उपाय म्हणजे एकच, कुणी अशा प्रकारे खाजगी माहिती विचारू लागताच त्याला दोन हात दूर ठेवणे.अशा प्रकारे तुमची बँक काही तपासणी करते का ह्याची खात्री करून घ्या व मगच अशा calls ला उत्तरे द्या. जर विश्वास बसत नसेल तर पलीकडील व्यक्तीला त्याची ओळख पटवून देण्यास सांगा.त्या करिता तुम्ही त्याच्या कार्यालयाचा पत्ता,आणि तुमच्या बद्दल त्याला किती माहिती आहे हे तपासून पहा आणि शक्य तितक्या वेळेस अशा फोन calls ना टाळाच. अशा प्रकारे कुणालाही माहिती देणे धोक्याचेच आहे.
एखादे वेळेस चुकून तुम्ही अशी माहिती दिलीत आणि फसवले जात असल्याचे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही कधीही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊ शकता आणि हो न विसरता तुमच्या बँकेला कळवून तुमचे खाते तात्पुरते बंद करू शकता.तक्रार करायला पुरावे आवश्यक असतात.

अशा अनेक पद्धती आणि युक्त्या आहेत ज्या द्वारे हे भामटे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील.सर्वच काही इथे सांगणे शक्य नाही,पण एक साधारण माहिती देण्याचा हा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी ह्या डिजिटल युगात सुरक्षित राहावे इतकाच माझा प्रयत्न.
अधिक माहिती हवी असल्यास comment चा पर्याय आहेच.

The post ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/technology/atm-card-hack/feed/ 0 15
व्हॉट्सअॅप ग्रुप http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%85%e0%a5%85%e0%a4%aa-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa/ http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%85%e0%a5%85%e0%a4%aa-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa/#respond Thu, 21 Aug 2014 08:00:12 +0000 http://ashutoshblog.in/?p=13 The post व्हॉट्सअॅप ग्रुप appeared first on आशुतोष.

आजकाल फेसबुक वर एक नवीनच trend पाहायला मिळतोय. कुणीतरी एक जण येतो (विशेषता फेसबूक ग्रूप वर) आणि आपण ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ काढू म्हणत सर्वाना mobile क्रमांक देण्याची विनंती करतो, आणि त्याच्या विनंती ला साद देत १५०-२०० सदस्य बिनधास्त क्रमांक देऊन टाकतात. सर्व जण आपला क्रमांक देतात खरे पण ह्या प्रकारातून निर्माण होणारया धोक्यांकडे कुणीही लक्ष देत […]

The post व्हॉट्सअॅप ग्रुप appeared first on आशुतोष.

]]>
The post व्हॉट्सअॅप ग्रुप appeared first on आशुतोष.

आजकाल फेसबुक वर एक नवीनच trend पाहायला मिळतोय. कुणीतरी एक जण येतो (विशेषता फेसबूक ग्रूप वर) आणि आपण ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ काढू म्हणत सर्वाना mobile क्रमांक देण्याची विनंती करतो, आणि त्याच्या विनंती ला साद देत १५०-२०० सदस्य बिनधास्त क्रमांक देऊन टाकतात. सर्व जण आपला क्रमांक देतात खरे पण ह्या प्रकारातून निर्माण होणारया धोक्यांकडे कुणीही लक्ष देत नाहीत, त्या करीताच हा लेख.
मुळात आपली खासगी माहिती फेसबुक वर टाकू नका असे नेहमीच सांगितले जाते. अन तरीही आपण आपला मोबाईल क्रमांक इतक्या खुलेआम टाकावा ह्याचा विचार आपण करीत नाही.तुम्ही म्हणाल दिला number तर काय झाले? त्यात काय एवढे? पण ह्यात देखील बरेच धोके आहेत. मुळात “cyber crime’ मध्ये तुमचा मोबाईल क्रमांक आणि बाकीची खासगी माहिती म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे, तीच इतक्या सहज पणे तुम्ही खुली करत असाल तर धोका वाढतोच.
टीप:पुढे दिलेली माहिती हि अर्धवट,संभ्रमात टाकणारी आहे असे तुम्हाला वाटू शकते,पण संपूर्ण माहिती इथे देणे शक्य नाही.
काय होते mobile number चे:
१. तुम्हाला कधी विनाकारण कर्ज देणाऱ्या संस्थांचे, विमा उतरवणाऱ्या कंपन्यांचे फोन येत असतील, आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ह्यांना माझा ‘number’ कोणी दिला? तर तो ह्यांना इथूनच मिळाला असण्याची शक्यता आहे. (ह्या प्रकाराला ‘data gathering/data collection’ अशी तांत्रिक नावे आहेत, आणि हो हा हजारो रुपये कमावण्याचा सहज सोपा मार्ग आहे)
२. हे जरा जास्तच गमतीदार आणि तितकेच धोकादायक, तुमच्या पैकी किती जण mobile number लाच ‘PASSWORD’ म्हणून वापरता हो? ह्याचाही विचार करा.
३. कुणीतरी पोस्ट टाकली, number गोळा केले, पण ग्रुप काढलाच नाही, मग तो data कुठे गेला?
४. तुम्ही number दिलात आणि त्याचा वापर cyber criminals नि फसवेगिरी, धमकेबाजी सारख्या गुन्ह्यात केला तर? होय, इतरांच्या क्रमांकावरून call करणे, sms करणे शक्य आहे,आणि ह्याच पद्धतीचा वापर दहशतवादी करावायांमधून झाल्याचे उघड आहे. अशा प्रसंगी number तुमच्या नावावर असल्याने कायद्याने तुम्हाला जबाबदार धरले जाते.
सरळ स्पष्ट सांगतो, कुठेही तुमचा number देऊ नका, अनोळखी व्यक्तीला नाहीच नाही. सर्वात मोठा धोका हा number चोरून तो विकल्या जाण्याचा आहे. (number विकणे म्हणजे काय ते सांगेल कधीतरी, पण असे number गोळा करून ते मार्केटिंग company ला विकण्याचा काळा उद्योग छुप्या पद्धतीने सुरु असतो आणि ह्यात लाखोंची उलाढाल आहे.)
त्यामुळे सुरक्षित राहा.तुमची खाजगी माहिती फेसबुक वर टाकणे आता बंद करा.
आपण सर्वांनी सुरक्षित राहावे ह्या विचाराने थोडक्यात म्हणणे मांडले आहे. सविस्तर माहिती करिता comment चा पर्याय आहेच.
-आशुतोष म्हैसेकर

The post व्हॉट्सअॅप ग्रुप appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/technology/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%85%e0%a5%85%e0%a4%aa-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa/feed/ 0 13