दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी

सुमारे २०० वर्षांपुर्वी,वाघिणीचं दुध म्हणविल्या गेलेल्या इंग्रजी भाषेच्या आगमनाच्या काळात ‘मराठी भाषेचे व्याकरण‘ वयाच्या विसाव्या वर्षी लिहून ते पूर्ण करणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२), तर्खडकर भाषांतरमाला या ग्रंथांच्या रूपाने सर्वपरिचित आहेतच. इंग्लिश भाषा शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना ती भाषा शिकणं सोपं वाटावं, या हेतूनं दादोबांनी ग्रंथाची रचना इंग्लिश व्याकरणाच्या पद्धतीनं केली. या…Continue reading दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी

लोकहितवादी गोपाळराव देशमुख

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी नवशिक्षणाची कास धरून लेखणीद्वारे समाजसुधारकाच्या भूमिकेत आलेल्या केवळ मोजक्या थोर लोकांपैकी एक होत ‘लोकहितवादी‘ अर्थात गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींची शतपत्रे नावाने प्रसिद्धी मिळालेल्या लेखमालेवरून लोकहितवादी आपल्या परिचयाचे आहेत.गोपाळराव देशमुखांना मिळालेली हि ‘लोकहितवादी‘ ओळख मुळात त्यांनी लेखक म्हणून वापरलेले टोपणनाव आहे.गोपाळ हरी देशमुख (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ – ऑक्टोबर ९, इ.स.…Continue reading लोकहितवादी गोपाळराव देशमुख

लोकमान्य टिळक

आज 23 जुलै,म्हणजे लोकमान्य टिळकांची जयंती,अहो जयंती म्हणण्यापेक्षा याला फक्त टिळकांची आठवण काढण्याचा दिवस म्हणुया! आज ठिकठिकाणी टिळकांच्या फोटोंना हार घातले जातील,शेंगांच्या टरफलांची गोष्ट सांगतील, पण हीच गोष्ट सांगणारी अन आजकाल काहिही ‘खाणारी’ मंडळी ती टरफलंतरी सोडतील की नाही ही शंकाच आहे, कधी काळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ म्हणणारे टिळक, गरीबांची संपत्ती लुबाडुन…Continue reading लोकमान्य टिळक

भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर

आपल्या निबंधामालेतून महाराष्ट्र राज्यात तेजस्वी राजकीय विचारांचा उगम घडवणाऱ्या भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची आज जयंती. ‘निबंधमाला’ या आपल्या लेखमालेतून त्यांनी ८४ विविध विषयांवर लिहिलेले लेख आजही प्रसिद्ध आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जयंती निमित्त आदरयुक्त अभिवादन. २० मे १८५० रोजी जन्मलेला या अवलिया ने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सोबत देशात क्रांती…Continue reading भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर

वीर बाजीराव पेशवे

वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळून पुढील केवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत ३५ लढाया खेळलेला आणि त्या सर्वच जिंकलेला ‘अपराजित’ ‘अजिंक्य’ योद्धा वीर बाजीराव पेशवे. भारताच्या इतिहासात इतक्या संख्येने लढाया खेळून त्यात एकही न हरणारा हा एकमेव पराक्रमी. आपल्या अद्वितीय युद्धकौशल्य च्या बळावर दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणणारा हा पराक्रमी…! ‘जीवाची…Continue reading वीर बाजीराव पेशवे

पराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे

पराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वतःचे आयुष्य भारतमातेसाठी वाहून देणाऱ्या युवकांपैकी एक अनंत कान्हेरे. केवळ १९ वर्षांच्या आपल्या आयुष्यात सर्वांनाच थक्क करेल आणि युवकांना प्रेरणा देईल असे कर्तुत्व गाजवणाऱ्या अनंत कान्हेरेंचा आज स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती देऊन यज्ञकुंड प्रज्वलित ठेवण्याचे महान कार्य करणाऱ्या अनेकानेक क्रांतीकारांपैकी ज्यांचे नाव प्रामुख्याने घेतले…Continue reading पराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे

क्रांतिकारी मंगल पांडे

क्रांतिकारी मंगल पांडे आज ८ एप्रिल, भारताच्या इतिहासात क्रांतीची बीजे रोवणाऱ्या क्रांतिकारी मंगल पांडे यांचा बलिदान दिवस. ज्यांच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशी म्हण असलेल्या इंग्रजांच्या पतनाचा सूर्य बनून आलेल्या मंगल पांडे यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवून दिली. २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडेच्या बंदुकीतून निघालेल्या त्या गोळीने संपूर्ण उत्तर भारताला इंग्रजांच्या विरोधात उभे…Continue reading क्रांतिकारी मंगल पांडे