इतिहास – आशुतोष http://ashutoshblog.in इतिहास-सामाजिक-तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख Wed, 28 Feb 2018 15:26:38 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=4.9.7 99790452 देवगिरीचे यादव http://ashutoshblog.in/history/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b5/ http://ashutoshblog.in/history/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b5/#comments Sat, 05 Nov 2016 12:46:43 +0000 http://ashutoshblog.in/?p=214 The post देवगिरीचे यादव appeared first on आशुतोष.

देवगिरीचे यादव संभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी. पायथ्याकडून पाहतानाच त्याची भव्यता लक्षात यावी आणि उंची पाहता मनात धडकी […]

The post देवगिरीचे यादव appeared first on आशुतोष.

]]>
The post देवगिरीचे यादव appeared first on आशुतोष.

देवगिरीचे यादव

संभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी. पायथ्याकडून पाहतानाच त्याची भव्यता लक्षात यावी आणि उंची पाहता मनात धडकी भरावी असे त्याचे रुपडे. शिवरायांची राजधानी रायगडी हलवली जाण्यापूर्वी सभासद बखरीत म्हटल्यानुसार “दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतू तो उंचीने थोडका, रायगड दौलताबादचे दशगुणी उंच.” अशी प्रत्यक्ष रायगडाशी तुलना ज्याच्या नशिबात होती तो हा देवगिरी. ह्या देवगिरी प्रांताने इतिहासाच्या दोन हजार वर्षांत अत्यंत भरभराटीचा काळ पहिला. इसवीसनपूर्व काळापासून चालत आलेले सातवाहन राज्य,इथल्याच पैठणचे. नंतरच्या काळात वेरूळ आणि औरंगाबाद लेण्यांच्या निमित्ताने राष्ट्रकुट राजांनी ह्या प्रदेशाला सौंदर्य दिलं. पुढे चालून यादव काळात हा उभा देवगिरी,यादवांची राजधानी बनून राहिला. तद्नंतर उत्तरेकडून झालेलं इस्लामी आक्रमण इथल्या इतिहासाला कलाटणी देऊन गेलं.इतिहासात वेडा तुघलक म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद बिन तुघलकाने तर अख्या भारताची राजधानी थेट दिल्लीहून इथवर हलवली.अन नंतर मुघल काळात दक्षिणविजयाच्या महत्वकांक्षा घेऊन आलेला औरंगजेब तो आला अन आजही आपल्या नावाची छाप ठेऊन आहे.

पण ह्या सर्व उतरा आणि चढाव पाहिलेल्या,हजारो वर्षांत व्यापार-राजकारण-कला-स्थापत्य आदि अनेक मार्गांनी आपला तो तो काळ सजवून घेतलेल्या ह्या देवगिरी प्रांतात एक महत्वाचा कालखंड ठरला तो म्हणजे यादव काळ. सुमारे दीडशे वर्षांच्या आसपास देवगिरीवरून आपला राज्यकारभार हाकणारे देवगिरीचे यादव राजे शेवटी मात्र उत्तरेकडून झालेल्या इस्लामी आक्रमणाला बळी पडले आणि या प्रांतावर असलेला सुमारे हजारावर वर्षे जुना स्वकीयांचा अंमल संपुष्टात येण्याला सुरुवात झाली. याच यादव काळाचा छोटासा आढावा म्हणून हा लेख.

सुरुवातीचा यादव काळ

मुळात यादव म्हणजे यदु वंशी राजे. थेट भगवान श्रीकृष्ण यांचा वंश, हा उत्तरेत वाढला. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात हे उत्तर भारतातील यादव दक्षिणेत येऊन राज्य करू लागले असावेत असा कयास बांधला जातो परंतु ह्याबाबतचे सबळ पुरावे मिळत नाहीत. या यादवांचा सुरुवातीचा काळ म्हणजे ‘सेऊणदेश’ म्हणजे आजचा खान्देश. थोडक्यात नाशिक आणि देवगिरीच्या आसपासच्या प्रदेशात या यादवांचे छोटेखानी राज्य असावे.
सुरुवातीच्या काळात यादव हे तत्कालीन दख्खनचे प्रशासक राष्ट्रकुट राजांचे सामंत होते. राष्ट्रकुटांच्या गुर्जर आणि प्रतीहार साम्राज्यांसोबत झालेल्या युद्धांत अमोघवर्ष (प्रथम) आणि कृष्ण (द्वितीय) या राष्ट्रकुट राजांना यादव साम्राज्याचे दृढप्रहर आणि सेउणचंद्र यांनी मदत केली. त्या बदल्यात त्यांना ‘सेउणदेश’ चा काही प्रदेश बक्षीस देण्यात आला होता. पैकी दृढप्रहर ऐवजी सेउणचंद्र हाच मूळ यादव साम्राज्याचा संस्थापक असावा यावरून थोडा गोंधळ आहे. यादवांनी आपली राजधानी नाशिक च्या ईशान्येस चंदोरी येथे उभी केली मात्र हेमाडपंताच्या व्रतखंडात सेउणचंद्राची राजधानी श्रीनगर (सिन्नर) असल्याचे सांगितले आहे. दृढप्रहराने इसवीसन ८६० ते ८८० च्या काळात आणि सेउणचंद्राने इसवीसन ८८० ते ९०० ह्या काळात ह्या प्रदेशावर राज्य केले. मात्र त्यांच्या अधिपत्याखाली असलेला प्रदेश हा आजच्या नाशिक जिल्ह्यापेक्षाही लहान होता.
या नंतरच्या काळात धडीयप्पा (प्रथम), भिल्लम (प्रथम) आणि राजीग हे यादव राजे होऊन गेले. इसवीसन ९०० ते ९५० च्या काळात ह्यांनी राज्य केले. पुढील काळात वाडीग्गा , भिल्लम (दुसरा), वाडूगी, वेसुगी, सेउणचंद्र (दुसरा), एरमदेव, सिंहराज, मल्लुगी अशा बऱ्याच यादव राजांचा उल्लेख इतिहासात आहे. यातील बहुतांश नावे ही रामकृष्ण भांडारकर यांच्या The Early History of Dekkan आणि हेमाडपंताच्या बखरीद्वारे मिळतात. परंतु ह्यात नंतरच्या काळात आलेला भिल्लम (पाचवा) इथून यादव साम्राज्याची खरी कारकीर्द सुरु होते. भांडारकर यांच्या म्हणण्यांनुसार दृढप्रहर ते भिल्लम पाचवा यांदरम्यान सुमारे २३ यादव राज्यकर्ते होऊन गेले. त्यातील बरेचसे राजे हे एकाच पिढीचे (म्हणजे भाऊ) असल्यामुळे खूप साऱ्या पिढ्यांचा काळ गेला नाही. राष्ट्रकुट साम्राज्याकडून चालुक्यांचा पराभव झाला तेव्हापासून सुमारे ४३७ वर्ष यादव राज्य करत होते. त्यामुळेच दख्खनच्या इतिहासात यादव काळाचे महत्त्व वाढते.

Geneology of yadavas according to Bhandarkar
Genealogy Of Yadavas as given By R.G Bhandarkar

भिल्लमचा उदय आणि देवगिरीची पायाभरणी

बाराव्या शतकाच्या शेवटच्या काळात चालुक्य घराण्याचा पाडाव होताच दख्खनेत असलेल्या अस्थिरतेचा पुरपूर फायदा यादवांनी घेतला. ह्या काळात अमरमल्लुगी चा मुलगा बल्लाळ (अमरमल्लुगी हा मल्लुगी चा मुलगा) यादव साम्राज्यावर राज्य करत होता. परंतु यादव साम्राज्याची आणि देवगिरीची पायाभरणी केली ती पाचव्या भिल्लमने. भिल्लम हा मल्लुगीचा मुलगा होता किंवा पुतण्या ह्यावरून साशंकता आहे. आपल्या घराण्यातीलच दुफळी टाळण्यासाठी भिल्लम ने सेउणप्रदेशाच्या बाहेर आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि दख्खनेत आपले स्वातंत्र्य घोषित केले.
भिल्लमाने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात केली ती श्रीवर्धनचा (हा किल्ला बीड किंवा आसपासच्या प्रदेशात असावा) किल्ला घेऊन. आणि तदनंतर प्रत्यंडगड (उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा गाव आहे तेथील परांडा किल्ला)  वर हल्ला केला. त्यानंतर दक्षिणेच्या दिशेने जाऊन ‘मंगलवेष्टके’ म्हणजे आजचे मंगळवेढे येथील राजाची हत्या केली. अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला. त्यामुळे भिल्लमचे स्वतःचे साम्राज्य हे यादवांच्या मूळ ‘सेउणदेश’ पेक्षा आकाराने बरेच मोठे झाले आणि भिल्लमच्या भावंडांमध्ये वितंड वाढले. परंतु भिल्लमाने इतर सर्व यादवांना थोपवत स्वतःला राज्यकर्ता घोषित केले. ह्याचा कालखंड इसविसन ११७५ च्या सुमारास धरता येईल.
स्वतःला राज्यकर्ता घोषित करताच आपल्या कारकि‍र्दीची सुरुवातीची काही वर्षे त्याने उत्तरेकडेच्या गुर्जर आणि माळवा प्रांताशी युद्धात घालवली आणि तिथे भरपूर यशही मिळाले. त्याने थेट मारवाड पर्यंत मजल मारल्याचे दाखलेही आहेत. मुत्तुगी आणि पाटणच्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे भिल्लम हा ‘माळव्याची डोकेदुखी’ बनला होता. त्याची उत्तरेतील कारकीर्द सुमारे इसवीसन ११८४ ते ११८८ दरम्यान राहिली असावी. उत्तरेत त्याने मारवाड पर्यंत मजल मारली असल्याचे दाखले असले तरी त्याला त्या प्रदेशांचा ताबा मिळवता आला नाही, मात्र मारवाड पर्यंत मारलेली मजल त्याला आत्मविश्वास देणारी ठरली असावी. म्हणून त्याने पुढे चालून संपूर्ण दख्खन चा सम्राट होण्याचे स्वप्न आखले. आधीच दख्खनच्या वर्चस्वावरून चालुक्य, होयसळ आणि कलचुरी साम्राज्यांमध्ये तणाव होताच. त्यात शेवटचा चालुक्य राजा सोमेश्वर ह्याला दक्षिणेतून होयसळ राजा वीरबल्लाळ आणि उत्तरेतून भिल्लम ह्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागले आणि ह्यात होयसळ राजा वीरबल्लाळशी तोंड देतानाच सोमेश्वर चालुक्याचा पराभव झाला आणि तो राज्य सोडून इतरत्र निघून गेला.
याच गोंधळात भिल्लमदेवास समोर असलेली संधी दिसून आली. चालुक्य राजा सोमेश्वराने पुनःश्च सैन्य उभारून लढण्याची तयारी न दाखवता राज्य सोडून निघून जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने समोरचा मार्गच मोकळा मिळाला अन होयसळ सैन्य येण्यापुर्वीच भिल्लमाने चालुक्यांची राजधानी कल्याणी (आजचे बसवकल्याण) आपल्या ताब्यात घेतली. तत्कालीन होयसळ नोंदीनुसार भिल्लमाने कल्याणीवर ताबा घेतल्याचा उल्लेख केला नसला तरी हेमाद्री (हेमाडपंत) ने त्याचा उल्लेख केला आहे. अन भिल्लमाने तत्काळ चालुक्यांच्या दक्षिणेत असलेल्या होयसळ सैन्यावर हल्ला केला. आधीच चालुक्यांवरच्या विजयामुळे आनंदात असलेल्या होयसळ सैन्याला भिल्लमाने पराभूत केले आणि म्हैसूर राज्यातील हसन प्रांताच्या भागापर्यंत थोपवून ठेवले. उपलब्ध माहितीनुसार इसविसन ११८७ ते ११८९ पर्यंत वरील घटना घडल्या असाव्यात. कल्याणीला असलेली राजधानी भिल्लमने देवगिरीला हलवली आणि आजचं देवगिरी हे शहर वसवलं. मुळात कल्याणी ही होयसळ साम्राज्याच्या अत्यंत जवळ होती, त्यामुळे बहुदा ती हलवून राज्याच्या अंतर्गत भागात हलवण्याचा विचार भिल्लमने केला असावा.

अशा पद्धतीने देवागिरीची पायाभरणी झाली आणि हळू हळू इथे किल्ला उभा राहत गेला. संपूर्ण किल्ला हा पाचव्या भिल्लमाने उभा केला नसला तरी त्याने त्याची सुरुवात केली हे नक्की. काहींच्या मते देवगिरीचा किल्ला हा राष्ट्रकुट राजांनी उभा केला असे मत व्यक्त केले जाते. कारण किल्ल्याच्या उभारणीतील मानवी हातांनी तासलेले कडे आणि भूलभुलय्या पाहता ते राष्ट्रकुटकालीन कार्य वाटते, असेच कार्य वेरुळच्या लेणी मध्येही आढळते, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा अथवा लिखित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा किल्ला भिल्लमानेच उभा करण्यास सुरुवात केली असे मानावे लागेल.

तिकडे दक्षिणेत पराभवाने चिडलेला होयसळ राजा वीरबल्लाळने पुनश्चः दख्खनविजया करिता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ त्याने बनावासी आणि नोलमबावडी वगैरे शहरे परत मिळवली. भिल्लमला येणाऱ्या काळाची चाहूल मिळाली आणि त्याने २ लक्ष पायदळ आणि १२००० घोडदळ घेऊन धारवाड कडे प्रयाण केले. इसविसन ११९१ च्या सुमारास धारवाड मधील सोरातूर येथे ह्या दोन्ही साम्राज्यांत युद्ध होऊन त्यात भिल्लम यादवाचा दारूण पराभव झाला. भिल्लमाचा सेनापती जैत्रपाल ह्याने मोठ्या हिमतीने लोकीगुंडी (लोकुंडी) चा किल्ला लढवला मात्र तो लढाईत मारला गेला. होयसळ वीरबल्लाळने येलबुर्ग,गुट्टी,बेल्लतगी आदी किल्ले जिंकून घेतले आणि कृष्णा व मलप्रभा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेशावर आपला ताबा प्रस्थापित केला.
ह्या युद्धात झालेल्या दारूण पराभवात झालेल्या आघाताने भिल्लमचा मृत्यू झाला. होयसळ नोंदीनुसार भिल्लम हा युद्धात मारला गेला व त्याचे शीर बल्लाळने तलवारी वर उचलून नेल्याचे म्हणतात परंतु ही नोंद इसविसन ११९८ मधील असून ११९२ मधील गदगचा शिलालेख मात्र भिल्लमच्या मृत्यूचा उल्लेख करत नाही.
भिल्लमाचा असा दारूण अंत झालेला असला तरी एक त्याला पराभूत राजा म्हणविता येणार नाही. कारण एक योद्धा म्हणून भिल्लमाने स्वतःचे असे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले होते. ते स्वतःच्या हिमतीवर उभे केले होते. उत्तरेत त्याने थेट मारवाड पर्यंत छापेमारी करून दाखवली होती. आणि एका चाणाक्ष बुद्धिमत्तेने योग्यवेळी चालून जाऊन त्याने होयसळ राजांची दख्खन ताब्यात घेण्याची योजना धुळीस मिळवली होती. त्याच्या पराभव केल्या नंतरही होयसळ बल्लाळने कृष्णा नदी ओलांडून पलीकडे जाण्याची योजना कधी केली नाही. त्यामुळे भिल्लम हा तत्कालीन दख्खनेतील एक हुशार आणि शौर्यवान योद्ध होता असे म्हणता येईल.

जैतुगी

भिल्लमाच्या मृत्यू पश्चात् त्याचा मुलगा जैतुगी हा इसवी सन ११९१ मध्ये सत्तेवर आला. अत्यंत संकटाच्या वेळी सत्तेवर येऊन देखील त्याने तत्काळ तयारी करून होयसळ साम्राज्यापासून सीमा सुरक्षित केल्या व कृष्णा नदी ही होयसळ आणि यादव साम्राज्याची सीमा ठरवली गेली.
पूर्वीच्या चालुक्यांचे सामंत असलेले काकतीय घराणे देखील हळूहळू डोके वर काढू लागले. भिल्लमच्या मृत्यूचा फायदा उठवत काकतीय राजा रुद्र ह्याने आपला भाऊ महादेव ह्यास यादव साम्राज्यावर मोहिमेत पाठवले. इसवी सन ११९४ च्या काळात होयसळ साम्राज्याबरोबर शांती प्रस्थापित झाल्यानंतर जैतुगीने थेट काकतीय साम्राज्यावर आक्रमण केले व त्यात राजा रुद्र मारला गेला तर त्याचा भाऊ महादेवचा मुलगा गणपती हा युद्धात पकडला गेला. महादेवने काही काळ चोख प्रतीउत्तर दिले मात्र तो देखील काही काळात मारला गेला. पुढच्या काळात संपूर्ण काकतीय प्रदेशावर जैतुगी यादवाचे नियंत्रण होते मात्र त्याने हिंदूधर्माच्या शिकवणीनुसार युद्धकैदी म्हणून पकडल्या गेलेल्या गणपतीस इसवीसन ११९८ मध्ये पुन्हा काकतीय साम्राज्याच्या गादीवर बसवले व पुढे संपूर्ण काळ यादवांचे पाईक म्हणून राहण्याचे वचन घेतले.
जैतुगीच्या कार्यकाळाचा शेवट नेमका कधी झाला ह्याबाबत स्पष्टता नसली तरी महाराष्ट्र सरकारच्या गझेट मध्ये ती १२१० मानली आहे.

सिंघणदेव

यादव साम्राज्याची धुरा सांभाळणारा पुढचा राज्यकर्ता म्हणजे जैतुगीचा मुलगा सिंघण. इसवी सन १२१० ते १२४७ च्या काळात हा सत्तेवर होता. लहानपणापासूनच प्रदीर्घ काळ राजकुमार होण्याचा अनुभव असल्याने सिंघण निश्चितच कुशल राज्यकर्ता होता. अन ते त्याच्या कारकि‍र्दीकडे पाहून लक्षात येतेच.
यादव सम्राटांपैकी सर्वात बलवान आणि कुशल राज्यकर्ता म्हणून सिंघणचे नाव घेता येईल. त्याला वापरले गेलेले ‘प्रौढप्रतापचक्रवर्ती’ हे विशेषण योग्य ठरते.
सिंघण हा सत्तेवर येण्यापुर्वीच त्याने १२०६ च्या काळात होयसळ बल्लाळचा त्याने पराभव केला होता आणि विजापूर प्रांताचा बराचसा भाग त्याने जिंकून घेतला.सत्तेवर येताच त्याने पुनः होयसळ साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरु करून धारवाड, अनंतपुर, बेल्लारी, चित्तलदुर्ग, शिमोगा आदी प्रदेश जिंकून घेतला.
कोल्हापूरचे शिलाहार राजे भोज हे यादवांचे पाईक होते मात्र तेथील राजा भोज ह्याने देखील आता यादव सत्तेविरोधात बंडाचे निशाण उगारले. त्यामुळे होयसळाविरुद्धची मोहीम पूर्ण होताच सिंघणदेव ने इसवी सन १२१७ मध्ये कोल्हापूर वर आक्रमण करून ताब्यात घेतले. तेथील राजा भोज जवळच असलेल्या परनाळा (पन्हाळा) किल्यावर पळून जाताच सिंघणने पन्हाळा देखील ताब्यात घेतला, राजा भोजला ताब्यात घेतले आणि त्याचे राज्य ताब्यात घेतले. ह्यानंतरच्या यादव घराण्यातील नोंदीनुसार सिंघणच्या एका सेनापतीने अंबाबाई मंदिरा समोर दरवाजा उभा केल्याचा उल्लेख आढळतो. कोल्हापूर येथून जवळच असलेल्या सौदत्ती मधील रट्टा वंशीय साम्राज्याचा अंत देखील सिंघणने करविला.
पुढच्या काळात सिंघणदेवने माळवा आणि गुजरात वर आक्रमण केले आणि तेथील परमार वंशीय साम्राज्यावर ताबा मिळवला. इसवी सन १२२० मध्ये केलेल्या आक्रमणात सिंघणला भरूचवर ताबा मिळवण्यात यश आले आणि बहुतांश गुजरात प्रदेशावर त्याचे नियंत्रण आले. पुढे झालेल्या अनेक मोहिमांत सिंघणने उत्तरेतल्या बहुतांश प्रदेशावर ताबा मिळवला आणि आपल्या नियंत्रणाखाली आणले.

सिंघणदेवच्या काळात यादव सत्तेने आपला सर्वोच्च यशस्वी काळ पाहिला. दक्षिणेतील होयसळ,काकतीय,चालुक्य किंवा मावळ,परमार यांपैकी कुणीही यादव साम्राज्याला विरोध करण्याची हिम्मत दाखवू शकला नाही आणि देवगिरीचे यादव, सिंघणदेवच्या काळात दख्खनचे मुख्य नियंत्रक बनून राहिले. उत्तरेस भरूच ते जबलपूर अशी नर्मदा नदी सीमा बनली. संपूर्ण मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातचा काही भाग, आंध्रचा उत्तर भाग, महाराष्ट्र आणि म्हैसूरच्या उत्तरेचा प्रदेश हा देवगिरीच्या छताखाली नियंत्रित झाला आणि यादव हे एकमेव दख्खनचे राजे बनले.
परंतु हे करत असताना सिंघणने काही महत्वाच्या चुका केल्या ज्यामुळे दख्खनचा पुढे येणारा सर्व इतिहास बदलला असता. उत्तरेतील मावळ, परमार, लता आदी साम्राज्ये इस्लामी आक्रमणांना तोंड देत असताना, अख्ख्या दख्खनवर नियंत्रण असणारे यादव आपल्या इतर शेजाऱ्यांना सामील होऊन इस्लामी आक्रमणाला सहज थोपवून,परतवून लावू शकले असते. पण दख्खन विजयाची महत्वाकांक्षा असलेल्या सिंघणने उत्तरेतील साम्राज्यांना इस्लामी आक्रमणा विरोधात मदत करण्याऐवजी त्यांच्यावरच हल्ले करून त्यांना नुकसान करण्याची घोडचूक केली. अन दख्खनच्या इतिहासात पुनश्चः एकदा भयंकर उलथापालथ घडवून येण्याचा मार्ग मोकळा झाला. इसवी सन १२४६ च्या सुमारास सिंघणदेवचा मृत्यू झाला व त्याचा मुलगा कृष्णदेव सत्तेवर आला.

कृष्णदेव

कृष्णदेव हा इसवी सन १२४६ पासून १२६० च्या दरम्यान सत्तेवर होता. कृष्णदेव सत्तेवर येताच त्याने उत्तरेतील परमार साम्राज्यावर पुनःश्च आक्रमण केले. इसवी सन १२३५ मध्ये इल्तुमश च्या आक्रमणामुळे आधीच भिलसा आणि उज्जयिनी प्रांत गमावून खिळखिळे झालेल्या परमार राजा जैतुगीदेववर आक्रमण करून कृष्णदेवने परमार साम्राज्य ताब्यात घेतले. परमारांना साठ देऊन उत्तरेकडून होत असलेल्या इस्लामी आक्रमणा विरोधात मोर्चा काढण्याऐवजी परमारांवरच आक्रमण करण्याचा कृष्णदेवचा निर्णय दुर्दैवी होता. त्यामुळे दख्खनचे राजे म्हणून उदयाला आलेले यादव साम्राज्य अशा चुकांमुळेच पुढील काळात क्षणार्धात कोसळण्याची वेळ ओढवून घेऊ लागले.
परामर साम्राज्य ताब्यात घेतल्या नंतर कृष्णदेव ने गुजरातवर हल्ला करून दक्षिण गुजरातचा प्रदेश ताब्यात घेतला. ह्या नंतर १२६० मध्ये कृष्णदेवचा मृत्यू झाला.

महादेव

कृष्णदेवच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रामचंद्र हा लहान असल्या कारणाने कृष्णदेवचा भाऊ महादेव हा सत्तेवर आला. याने उत्तर कोकणातील शिलाहार साम्राज्यावर ताबा मिळवला. काकतीय साम्राज्यातील गणपती ह्या राजाच्या मृत्यूनंतर त्याची कन्या रुद्रम्बा ही सत्तेवर आली, त्यावेळी काकतीय साम्राज्यावर महादेवने प्रहार करून काकतीय सैन्यातील काही हत्ती पळवून नेले.

ह्याच महादेव राजाच्या पदरी असलेला मंत्री म्हणजे हेमाद्री अर्थात हेमाडपंत. ह्याच हेमाडपंताने व्रत-खंड, प्रसती, चतुर्वर्गचिंतामणि यांसारख्या ग्रंथांची निर्मिती केली. दख्खनच्या पठारावर होत असलेल्या ज्वारीच्या पिकाचा जनक म्हणून हेमाडपंताचे नाव घेतले जाते. आणखी महत्वाची कार्ये म्हणजे हेमाडपंताने मोडी लिपी वापरात आणून प्रचलित केली. सोबतच महाराष्ट्रात आढळणाऱ्या अनेक पुरातन मंदिरांपैकी ‘हेमाडपंती’ मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बांधकामाची विशिष्ट पद्धत म्हणजे चुना न भरता दगडे एकमेकांना जोडण्याची पद्धत हेमाडपंताने प्रचलित केली.

अम्मना

महादेवच्या मृत्यूनंतर आधी म्हटल्याप्रमाणे कृष्णदेवचा मुलगा रामचंद्र हा सत्तेवर येणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता महादेवचा मुलगा अम्मान हा सत्तेवर आला. परंतु आता बराच वयात आलेला रामचंद्रदेव हा खरा सत्तेचा अधिकारी ठरत असल्याने महादेवच्या मंत्रीमंडळातील बहुमतांशी सरदारांचा कल रामचंद्रकडे होता. त्यात ऐन तरुण वयात असलेल्या अम्मानला संगीत व नृत्याची विशेष आवड होती.
ह्याचाच फायदा घेत, अम्मानाच्या सत्तेवर आल्यानंतर राज्याबाहेर गेलेला रामचंद्र आपल्या काही विशेष व खात्रीतल्या सहकाऱ्यांसह नाट्यकाराचा वेश घेऊन देवगिरीच्या किल्ल्यात दाखल झाला व अम्मनाच्या दरबारात येऊन कला सादर करण्याच्या बहाण्याने त्याने थेट दरबारात अम्मनाला ताब्यात घेऊन कैद केले व मंत्रीमंडळातील इतर सरदारांच्या मदतीने स्वतःला पुन्हा सत्तेवर आणले.

रामचंद्रदेव

आपल्या चुलत भावाने मिळवलेली सत्ता परत घेऊन इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रामचंद्र इसवी सन १२७१ मध्ये सत्तेवर आला. रामचंद्रने पुन्हा एकदा उत्तरेतील माळवा आणि परमार साम्राज्यावर आक्रमण करून सहज त्यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा एकदा दक्षिणेकडेच्या होयसळ साम्राज्यावर आक्रमण करून त्यांच्या राजधानी पर्यंत मजल मारली. परंतु पुन्हा झालेल्या प्रतिकारामुळे रामचंद्रच्या सैन्याला माघार घ्यावी लागली.
त्यानंतर १२८६ ते १२९० च्या दरम्यान, रामचंद्रदेव यादवने ईशान्येला साम्राज्य विस्तार करण्याची योजना आखली आणि त्या नुसार आजचा चंद्रपूर भंडारा च्या पलीकडील प्रदेश जिंकून घेत जबलपूर जवळील त्रिपुरी देखील ताब्यात घेतले. एका शिलालेखानुसार यादव राजा रामचंद्रने बनारस (वाराणशी) वर ताबा मिळवल्याचा उल्लेख आहे मात्र तो ताबा फार कल टिकून राहू शकला नाही. जलालुद्दीन खिलजीच्या शक्ती पुढे रामचंद्रला माघार घ्यावी लागली आणि त्याचे सैन्य दक्षिणेत परतले. मात्र ह्या वाराणशी मोहिमेदरम्यान एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे तिथून जवळच असलेला माणिकपूरचा सरदार अल्लाउद्दिन खिलजीच्या सुभेदारीला पोहोचलेली झळ. रामचंद्रच्या स्वारी आणि चापेमारी मुळे अल्लाउद्दीनच्या क्षेत्रालाही हानी पोहोचली असावी ह्यातूनच बहुदा अल्लाउद्दीन ने दक्षिणेवर,विशेषतः यादव साम्राज्याकडून बदला घेण्याचे ठरवले असावे.
रामचंद्रदेवचा काळ म्हणजे अनेकविध साहित्य निपुणांनी नटला आहे. महादेव यादवच्या पदरी असलेला हेमाडपंत रामचंद्रदेवच्या पदरी देखील होता. रामचंद्रदेव रायाच्या काळातच संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. अन ह्याच काळ अनेक महानुभाव संत उदयास आले.

इस्लामी शक्तींचा दख्खनेत प्रवेश आणि यादव साम्राज्याचा अंत

इस्लामी शक्तींचा उत्तरेतला प्रभाव वाढू लागला आणि सुमारे शंभर वर्ष जुन्या यादव साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. तेराव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांत उत्तरेतल्या चालुक्य,परमार आदी साम्राज्याचा होत असलेला विनाश पाहून हीचं वेळ आपल्यावर देखील येईल आणि आपण त्यासाठी तयार राहावे असा विचार दुर्दैवाने यादव सम्राटाने केला नाही. उलट आधीच खिळखिळी झालेल्या आपल्या शेजारी साम्राज्यांशी दोन हात करून त्यांच्या विनाश घडवण्यात भागीदारी मिळवली.
आपल्या शेजारी राष्ट्रांशी मित्रत्व पत्करून परकीय सत्तेला आव्हान देण्याचे आणि आपल्या सर्वांचीच साम्राज्ये सुरक्षित करण्याचे पर्याय असताना यादव साम्राज्यासारख्या बलाढ्य शक्तीने अगदी उलट काम केले. त्यामुळे इस्लामी शक्तींना एक एक करत सर्वच राष्ट्रांचा विनाश करणे सहज शक्य झाले.
यादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो १२९४ च्या काळात. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दख्खनस्वारी करिता यादवांवर लक्ष ठेउनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरी वर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरी पासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा,कारण यादवांचे सैन्य विभागलेलं नसे. वर सांगितल्या प्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीन ला आयती संधी मिळाली आणि त्याने अत्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत, जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दिन देवगिरीच्या दिशेने निघाला.
देवगिरीपासून ८० मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दिन येऊन पोचला त्यावेळेस रामचंद्रदेवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्राच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल्याला अल्लाउद्दिन खिलजीने वेढा घातला. अचानक समोर आलेला नव्हे थेट दाराशी येऊन ठेपलेला शत्रू पाहता रामचंद्रची काहीही तयारी नव्हती. त्याने आपला मुलगा शंकरदेवला तत्काळ परत येण्याचा निरोप तर धाडला होता खरा पण त्याच्या आगमनापर्यंत तग धरू शकेल इतकी देवगिरी किल्ल्याची तयारी नव्हती. आतील अन्नधान्यसाठा देखील पुरेसा नव्हता. त्यामुळे रामचंद्रने किल्ल्यातच शरणागती पत्करली आणि मोठ्या प्रमाणावर सोने, मोती, दागिने आणि हत्ती व घोडे खिलजीला देण्याचे काबुल केले. सोबतच वार्षिक महसूलही देऊ केला. त्याने शरणागती पत्करताच काही काळात रामचंद्रचा मुलगा संपूर्ण सैन्यासह देवगिरीवर दाखल झाला. त्याने खिलजीवर हल्ला करण्यचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. अन अशा तर्‍हेने दख्खनचे सर्वात मोठे साम्राज्य उत्तरेतील परकीय शक्तीचे पायिक बनले.
देवगिरीच्या पडावा होण्या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते. रामचंद्र किल्ल्याच्या वेढ्यात अडकला असताना माघारी खिलजीच्या सैन्या सोबत अधिक मोठे सैन्य दाखल होते आहे असे त्याला दिसून आले. ते खिलजीचे वाढीव सैन्य असावे आणि आता खिलजीची ताकद अधिक वाढली तर आपले काही खरे नाही असा कयास रामचंद्रने बांधला आणि तत्काळ शरण गेला. परंतु किल्ल्याची द्वारे उघडल्यानंतर रामचंद्रच्या लक्षात आले की मागून येत असलेले सैन्य म्हणजे त्याचाच मुलगा शंकरदेव हा होता. परंतु हे केवळ आख्यायिका असून ह्याला कुठलाही आधार नाही.
पुढे आयुष्यभर अल्लाउद्दिन खिलजी चा पाइक बनून राहिलल्या रामचंद्रचा मृत्यू इसवीसन १३११ मध्ये झाला. मधल्या काळात शंकरदेवने पुनःश्च खिलजी विरुद्ध उठाव केल्याने रामचंद्रला दिल्लीत अटक करवून नेण्यात आले खरे पण तेथे खिलजीने त्यास सन्मानाची वागणूक दिली.

शंकरदेव

रामचंद्रच्या मृत्युनंतर शंकरदेव सत्तेवर आला. शंकरदेव हा आपल्या पित्याच्या अत्यंत विरुद्ध स्वभावाचा होता. रामचंद्रने अगदी अलगद पत्करलेले पाईकत्व त्याला अजिबात मान्य नव्हते आणि तो सदैव खिलजीचा विरोध करू लागला. त्याने देवगिरीला पुन्हा स्वतंत्र करण्याची घोषणा केली. हे एक मोठे धाडसच होते आणि ते योग्यही असले तरी देवगिरी चे यादव साम्राज्य अत्यंत कमकुवत बनले होते.
शंकरदेवने पुन्हा उठाव करताच अल्लाउद्दिन खिलजी ने मलिक काफुरला दख्खनेत धाडले. मलिक काफुर ने शंकरदेवची हत्या करून यादवांना अस्ताला नेले अन यादव साम्राज्य केवळ नावाला उरले.
यादव सत्तेचा सूर्यास्त.
इसवी सन १३१५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजी चा मृत्यू होताच मलिक काफुर दिल्ली कडे परत निघून गेला अन त्याचा फायदा उचलावा म्हणून रामचंद्रचा जावई हरपालदेव आणि राघव नामक एक सरदार ह्यांनी पुनः यादव सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. परंतु दिल्लीच्या सत्तेवर नव्याने आलेलं कुतुब मुबारक शाह ने १३१८ मध्ये देवगिरीकडे कूच करून हरपालदेवला ताब्यात घेतले व त्याला फासावर लटकवले अन अशाप्रकारे दख्खनच्या एक बलाढ्य साम्राज्याचा सूर्यास्त झाला कायमचा.

ह्या यादव इतिहासात विशेष नमूद करावे ते म्हणजे एका छोट्या,स्वतःच्या हिम्मतीवर निर्माण केलेल्या पाचव्या भिल्लमाच्या यादव साम्राज्याने दख्खनसम्राट होण्याचे स्वप्न पाहिले,आपल्या इतर बलाढ्य प्रतीस्पर्ध्यांना मात देत त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले देखील मात्र आपल्या महत्वकांक्षा पूर्ण करत असतानाच बदलत्या काळाची कास धरत,वेळ पडेल तसे राजकारणाची गणितं बदलत अस्तित्व टिकवून ठेवणे यादवांना जमले नाही आणि एका हिंदू साम्राज्याचा दुर्दैवी अंत झाला.
– आशुतोष म्हैसेकर

 

हा लेख दैनिक सामना (संभाजीनगर आवृत्ती) द्वारा प्रकाशित दिवाळी २०१६ अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.

 

टिपण: वरील लेखात भिल्लम च्या कारकिर्दीबद्दल दिलेल्या माहितीत काही बदल केला आहे. त्याचा संदर्भ ‘मिसळपाव’ कट्ट्यावरील प्रचेतस ह्यांच्या सूचनेनुसार. बाह्य दुवा

The post देवगिरीचे यादव appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/history/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b5/feed/ 1 214
मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान http://ashutoshblog.in/personalities/%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0/ http://ashutoshblog.in/personalities/%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0/#comments Sun, 24 Jul 2016 03:10:01 +0000 http://ashutoshblog.in/?p=194 The post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.

औरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते ‘मलिक अंबर’. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख […]

The post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.

]]>
The post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.

औरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते ‘मलिक अंबर’. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख त्याची करून द्यावी ती म्हणजे एक उत्तम राजकारणी,प्रशासक अन कर्तुत्ववान योद्धा.

जगात इतर कुठल्याही भूमीला न लाभलेला इतका सुंदर,विविध पैलूंनी नटलेला भारतीय इतिहास म्हणजे आश्चर्यांची खाण म्हणावी लागते. आपल्या बहरलेल्या ऐतिहासिक पुस्तकांच्या पानांतून अनेक आश्चर्यकारक गोष्टींना जन्म देणारा हा भारतीय इतिहास काही गूढ व्यक्तींना आपल्या जीर्ण पानांतून दडवून ठेवतो अन त्यापैकीच एक म्हणजे मलिक अंबर. दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना विशेषतः बादशाह जहांगीरला त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा. एक हबशी गुलाम म्हणून भारतात येउन पोचलेला पुढे हळू हळू कर्तुत्व गाजवत थेट अहमदनगरच्या निझामाचा ‘पेशवा’ अर्थात पंतप्रधान झाला. ढासळलेली निजामशाही सावरून ती सांभाळण्याचं काम करणं हे अत्यंत धाडसाचं अन कौशल्यपूर्ण काम मलिक अंबर ने केलं. केवळ मुघलांना दख्खनेत उतरण्यापासून रोखण्याचं नव्हे तर एक आदर्श राज्यपद्धती सुरु करून इथल्या मुलखाचा विकास करण्याचं श्रेय मलिक अंबर ला द्यावं लागेल. ह्याच मलिक अंबर ची औरंगाबाद शहराचा निर्माता ह्या पलीकडची ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न.

 

मलिक अंबर एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान

मलिक अंबर च्या जन्माची तारीख आणि वर्ष नेमके वर्ष सांगता येत नाही परंतु १५४० ते ५० च्या उत्तरार्धात इथिओपिया च्या हरार मध्ये मलिक अंबर चा जन्म झाला.इथिओपिया चं जुनं नाव होतं ‘अबसीनिआ’ (Abyssinia) त्यावरून अरब त्यांना हब्श म्हणत ज्यांना भारतात ‘हबशी’ म्हणून ओळखलं जातं.मलिक अंबर चं मूळ नाव ‘चापू’ आणि ‘शांबू’ असल्याचं वाचायला मिळतं. मलिक अंबर लहान असतानाच गुलाम म्हणून विक्री का झाला ह्याचे बरेच अनुमान असले तरी बहुदा गरिबी मुळे आई वडिलांनीच त्याची विक्री केली अथवा अरबांच्या हल्ल्यात तो गुलाम म्हणून पकडला गेला असावा. आपल्या लहान वयातच अनेक वेळा विक्री होत यमन आणि मक्का मधील गुलामांच्या बाजारांतून तो बगदाद मधील मीर कासीम अल-बगदादी नामक त्याच्या मालकाच्या हाती येउन पडला.याच मधल्या काळात ह्या इस्लाम च्या शिकवणी नुसार चापू ‘काफिर’ चा धर्म बदलून त्याला इस्लाम बनवण्यात आलं.बगदाद मध्ये असतानाच त्याला ‘अंबर’ हे नवीन नाव मिळालं अन तिथून मजूर म्हणून अंबर ची पाठवणी दक्षिण मध्य भारतात झाली.

भारतात आल्यावर अंबर चंगेज खान च्या सेवेत आला. चंगेज खान हा स्वतः हबशी. चंगेज खान,अहमदनगरच्या निजामाचा ‘पेशवा’ म्हणजे पंतप्रधान होता. सुमारे १५७० च्या काळात चंगेज खानच्या सान्निध्यात आल्यापासूनच अंबर हा इतर गुलामांच्या तुलनेत हुशार आणि शौर्य गाजवणारा असल्यामुळे त्याची नेमणूक चंगेज खान च्या रक्षणात झाली. चंगेज खानच्या सान्निध्यात राजकारण अन उत्तम प्रशासनाचे तंत्र मलिक अंबर ने अवगत केलं. पुढे चंगेज खान चा मृत्यू होताच त्याच्या सेवेतले अनेक हबशी गुलाम स्वतंत्र झाले, अंबर ने देखील आपली एक छोटी हबशी घोडेस्वारांची सैन्य तुकडी उभी करून निझामशहा च्या सेवेतून बाहेर पडला. अहमदनगरच्या निझामशाही साम्राज्याचा होत असलेला ऱ्हास पाहून अंबर आपल्या सैन्यासह सुरवातीला गोलकोंडा व नंतर विजापूर दरबार च्या सेवेत गेला मात्र तेथेही त्याला फारशी संधी न मिळाल्याने अंबर पुनश्च अहमदनगरला परतला. विजापूर च्या सेवेत असतानाच आदिलशहा ने त्याला ‘मलिक’ ही पदवी देऊन गौरव केला होता व पुढे त्याचे हेच नाव प्रचलित झाले.

अहमदनगर च्या गादीवर बसलेला कमकुवत निझाम पाहून अकबर सुद्धा आपली दख्खन विजयाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तयारीत होता. त्याकरिता बरेच सैन्य त्याने दक्षिणेत पाठवले,अनेक हल्ले केले पण अहमदनगर च्या सेवेत आता ‘मलिक अंबर’ नामक एक कृष्णवर्णी सेनानी होता. मुघल सेनेवर छोटेमोठे हल्ले करणं,त्यांची रसद लुटून आणणं,त्यांचा दारुगोळा पळवणं असे प्रकार करून मलिक अंबरने मुघल सैन्याला त्रस्त केलं. त्याच्या ह्याच कामामुळे हळू हळू करत त्याला निझामाच्या पदरी मोठा सन्मान मिळत गेला,त्याचे सैन्यबळ ही वाढतच गेलं. पुढे निजाम कमकुवत होतच गेला आणि मुघलांनी थेट अहमदनगर किल्ला ताब्यात घेतला,पण मुघलांच्या नशिबात दिग्विजय बहुदा लिहिलाच नव्हता,अहमदनगर ची राजधानी पडली असली तरी किल्ला आणि आसपासचा भाग सोडला तर इतर प्रदेशावर मुघलांचा ताबा नव्हता. त्याचा फायदा घेत मलिक अंबर आपल्या सैन्यासह निसटला आणि थेट परंडा येथे पोचला. इथून पुढे त्याच्या मुत्सद्दीपणा चा एक उत्तम नमुना सांगता येऊ शकेल. मलिक अंबर ने निझामशाही वंशातल्या अली मुर्तुझा द्वितीय ह्याच्याशी आपल्या  मुलीचा विवाह करवून दिला अन त्याला निजामशाही साम्राज्याचा सम्राट घोषित केलं. अन स्वतः त्या निजामाचा वजीर म्हणून कारभार पाहू लागला. आता संपूर्ण निजामशाहीची कमान आपल्या हातात घेऊन मलिक अंबर दक्षिणेच्या राजकारणात महत्वाचा दुवा बनला होता. त्याने परंडा येथेच निझामाची राजधानी स्थापली अन मुघलांच्या ताब्यातला बराच प्रदेश पुन्हा अहमदनगर साम्राज्यात आणला.

एव्हाना मलिक अंबर ५०,००० हून अधिक सैन्याचे नेतृत्व करू लागला,त्याने मराठे (मराठी बोलणारे) सरदारांच्या मदतीने ४०,००० मराठे सैन्य उभे केले. आपल्या ‘गनिमी कावा’ या युद्धतंत्राचा वापर करून पुढची तीन दशकं त्याने मुघलांना सळो की पळो करून सोडलं.पुढे दख्खन चा प्रदेश मुघलांच्या तावडीतून मुक्त करून त्याने परंडा वरून राजधानी जंजिरा इथे हलवली. दौलताबाद सारखा किल्ला साम्राज्यात आणला अन मोक्याच्या जागांवर अनेक छोटे मोठे किल्ले उभे केले जेणेकरून प्रदेशाची निगराणी सोपी झाली. मुघला सोबत अनेक मोठ्या लढाया होऊन त्यांना पराभव दाखवला. अकबराच्या मृत्यू नंतर सत्तेवर आलेला जहांगीर,मलिक अंबर ची धास्ती घेऊन प्रचंड चिडला होता,त्या बाबत त्याच्या चित्रकाराने काढलेलं चित्र बरंच काही बोलून जातं ज्यात बादशहा जहांगीर एका पृथ्वीच्या गोलावर उभा राहून मलिक अंबरच्या मुंडक्यावर धनुष्य रोखून आहे. ह्या चित्रातून जहांगिराची मलिक अंबर बद्दल असलेली चीड स्पष्ट होते. मलिक अंबर मराठ्यांच्या आधी मुघलांना त्रस्त कारून सोडणारा हा हबशी योद्धा इतिहासाच्या पानांत मात्र हरवून गेला.

malik-ambar-jahangir

१६०५ ते १६२६ ह्या काळात मलिक अंबर निजामशाहीची सूत्रे हातात घेऊन होता,मात्र त्याच्या मृत्य नंतर अवघ्या दहा वर्षांत अहमदनगर ची निजामशाही कायमची नष्ट झाली ह्यावरून निजामशाही केवळ मलिक अंबर व त्याच्या कुशल सैन्याच्या आणि प्रशासनाच्या खांद्यावर कशी टिकून होती हे स्पष्ट होतं.

 

मलिक अंबर: मराठी सैन्याची पायाभरणी

मुळात मलिक अंबर हा हबशी,तो इथे गुलाम म्हणून आला अन चंगेज खानच्या मृत्यू नंतर जेव्हा तो स्वतंत्र झाला त्याच्या पदरी १५०० घोडेस्वार सैन्य होतं. पण येत्या काळात झालेल्या घडामोडी त्याला महत्व देत गेल्या आणि त्याला अधिकाधिक सैन्याची गरज पडली. त्यावेळी मुघलांच्या स्वाऱ्या सहन करून त्रस्त झालेला मराठी प्रदेश व इथला सामान्य शेतकरी वर्ग यांना सोबत घेऊन मलिक अंबर ने त्याचं सैन्य उभं करायला सुरुवात केली. आधीचे स्वतंत्र झालेले हबशी सैन्य अन मराठे मिळून मलिक अंबर कडे सुमारे ५०,००० सैन्य गोळा होत गेलं.

मलिक अंबर च्या पदरी अनेक मराठे सरदार होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा व शहाजी राजेंचे वडील मालोजी राजे हे अंबर च्या अत्यंत विश्वासातले सरदार म्हणून ओळखले जात.आपल्या सोबत असलेल्या अनेक मराठे

 

मलिक अंबर आणि प्रशासन

केवळ शौर्य गाजवून,मराठ्यांना एकत्र करून मुघलांना त्रस्त करणेच नव्हे तर राज्य करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल मलिक अंबर ने घडवले. सामान्य जनतेकडून मिळणारा महसुल त्याने ३३ टक्यांपर्यंत कमी केला,तसेच शेतसारा गोळा करण्याची पद्धती बदलून ठराविक महसुल न घेता दरवर्षी जितके उत्पन्न होईल त्यानुसार महसुल कमी जास्त करण्याची मुभा देणारी पध्दत मलिक अंबर ने घालून दिली. ह्यातून सामान्य शेतकरी वर्ग बराच सुखावला,तसेच प्रत्येक प्रदेशाची प्रतवारी निश्चित करून त्यानुसार प्रत्येक ठिकाणी महसुल कमी जास्त केला गेला ह्या सगळ्यांमुळेच मलिक अंबर सामान्य जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवून होता. प्रशासन करण्याची नवीन पध्दत राबवल्याने मलिक अंबर ला जनतेचं भरपूर पाठबळ मिळालं अन तो लोकप्रिय झाला.

 

The post मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/personalities/%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0/feed/ 3 194
सावरकर आम्हाला माफ करा http://ashutoshblog.in/history/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be/ http://ashutoshblog.in/history/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be/#comments Fri, 27 May 2016 18:22:55 +0000 http://ashutoshblog.in/?p=186 The post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.

सावरकर आम्हाला माफ करा! पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य? ते तर १९४७ लाच मिळालं ना? अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या […]

The post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.

]]>
The post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.

सावरकर आम्हाला माफ करा! पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य? ते तर १९४७ लाच मिळालं ना?

अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या सारख्या वीरांचा कोण विचार करतोय?

तुम्ही म्हणालात हाती शस्त्र घ्या,इंग्रजांना संपवा,पण अहो सहज सोपं ‘बिना खड्ग बिना ढाल’ स्वातंत्र्य मिळत असताना हे तुम्ही ब्रिटन मधून लपवून पिस्तुलं काय भारतात पाठवत बसलात,त्यात जॅक्सन वगैरे एक दोन गोरे मेले पण त्या हत्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही.

तात्याराव,अहो तुम्ही बोटीतून थेट समुद्रात झेपावलात,ब्रिटन च्या पंतप्रधानालाही अपमान स्वीकारून माफी मागायला लावलीत,पण तुम्ही जसं अंदमानाच्या काळकोठडीत कैद झालात,तसं आम्हीही तुम्हाला आमच्या मनातल्या अंधार कोपऱ्यात अडगळीत ठेवून दिलं.स्वातंत्र्य पश्चात तुम्ही कुठल्या अंधार खोलती हरवलात कुणालाच माहित नाही!

तात्याराव,आम्हाला खरंच माफ करा,पण तुम्ही १८५७ चा अख्खा इतिहास मोठ्या कष्टानं आम्हाला शिकवलात, पण आमच्या इतिहासाच्या पुस्तकात तुमची पानभर माहिती देखील आम्ही कधी लिहू शकलो नाही,दोन जन्मठेपा भोगताना सोसलेले तुमचे कष्ट तुम्हाला मिळालेल्या दोन परिच्छेदाच्या जागेत मावणार कसे?

तुम्ही देशभक्ती जागृत केलीत,आम्हाला स्वाभिमान शिकवलात,पण आम्ही तर अब्राहम लिंकन चेही फोटो शाळेत लावलेत पण तुमचं जयोस्तुते मुलांना शिकवायचं आम्ही विसरलो!

अहो तात्याराव,तुम्ही फक्त राष्ट्रभक्त नव्हे,मोठे साहित्यिक सुद्धा होतात,खूप मोठी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली,कवितांची संख्या तर अगणित आहे,अगदी मराठी भाषेला नवीन शब्द देऊन,मराठीला शुद्ध रूप देण्यात तुमचं मोठं योगदान,पण आताच्या कॉन्व्हेंट अन मिशनरी स्कुल वाल्या आम्हाला मराठीमधलं तुमचं साहित्य वाचता कुठे येतंय?

तुम्ही जेलबाहेर स्थानबद्ध होतात,तिथेही समाजसुधारणा तुम्ही घडवलीत,अहो जात्युच्छेदन काम करणारे तुम्ही फक्त ब्राह्मण म्हणून बदनाम झालात,कारण तुमच्या नावाला राजकीय ‘व्हॅल्यू’ नाही,तुमच्या नावावर कोणी व्होट टाकत नाही!

तुम्ही काळाच्या गरजेला शोभणारी विज्ञानवादी दृष्टी दिलीत,पण ती पाहायला लागणारे चष्मे आज आमच्याकडे नाहीत,

तात्याराव, आम्हाला खरंच माफ करा,तुमचं देशप्रेम,तुमची राष्ट्रभक्ती,तुमची स्वातंत्र्याची तळमळ,तुमचं साहित्य,तुमच्या कविता,ती ‘ने मजसी ने’ मधली अगतिकता,ते ‘जयोस्तुते’,ते जात्युच्छेदन,ती आधुनिक दृष्टी,अहो तात्याराव ते सगळं सगळं आज आम्ही आऊटडेटेड करून टाकलं आहे,थोडक्यात तात्याराव,जन्माची राखरांगोळी करून,घरदारावर पाणी सोडून जगलेला तुम्ही,जितेपणी अंदमानच्या काळकोठडीत अन आत्मार्पणानंतर राजकारणाच्या अडगळीत राहिलात!

तात्याराव तुम्हीच,फक्त तुम्हीच आम्हाला स्वातंत्र्य दिलंत,आम्ही तुम्हाला चार पानांची जागाही देऊ शकलो नाही,

तात्याराव आम्हाला माफ करा,तुम्हाला पाहून अंदमानच्या दगडी भिंतींनाही पाझर फुटेल,पण आमच्या पाषाण हृदयाला तुमच्या आयुष्यभराच्या कार्याची किंमत कधी कळाली नाही,कळणार नाही!

The post सावरकर आम्हाला माफ करा appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/history/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be/feed/ 3 186
एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी http://ashutoshblog.in/history/%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%9a%e0%a4%be/ http://ashutoshblog.in/history/%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%9a%e0%a4%be/#respond Sat, 19 Mar 2016 16:34:49 +0000 http://ashutoshblog.in/?p=171 The post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.

सध्या आपल्या नवनवीन वादग्रस्त विधानांनी राजकीय सामाजिक वातावरण तापवू पाहत असलेले खासदार ओवेसी मिडिया च्या उपलब्धते मुळे सगळी कडे गाजत असले तरी ह्या एमआयएम चे हे प्रकार काही नवीन नाहीत. आपली धर्मांध वक्तव्यं ही एमआयएम च्या इतिहासाला साजेशीच ठरत आहेत. हा इतिहास बोलला गेला नाही तरी तो फार काही लपून राहणारा नाही, अनेकवेळा मिडिया आणि […]

The post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.

]]>
The post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.

सध्या आपल्या नवनवीन वादग्रस्त विधानांनी राजकीय सामाजिक वातावरण तापवू पाहत असलेले खासदार ओवेसी मिडिया च्या उपलब्धते मुळे सगळी कडे गाजत असले तरी ह्या एमआयएम चे हे प्रकार काही नवीन नाहीत. आपली धर्मांध वक्तव्यं ही एमआयएम च्या इतिहासाला साजेशीच ठरत आहेत. हा इतिहास बोलला गेला नाही तरी तो फार काही लपून राहणारा नाही, अनेकवेळा मिडिया आणि वृत्तपत्रे असद-उद्दीन ओवेसीना ‘कासीम रझवी’ नामक इतिहासातल्या कुण्या व्यक्ति बद्दल विचारतात, पण असद-उद्दीन ओवेसीने ‘आपण रझवी चे कुणी लागत नाही,रझवी आणि एमआयएम चा काही संबंध नाही’ इतके बोलून एमआयएम चा काळा इतिहास (बहुधा त्यांनाही तो सांगण्यास लाज वाटत असावी) लपून राहत असेल असे कदापि नाही. या निमित्ताने या ‘एम-आय-एम’ बद्दल बरेच प्रश्न मनात येतात, त्या निमित्ताने या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन (AIMIM) एमआयएम चा इतिहास मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.

काय आहे एमआयएम चा इतिहास?

एम आय एम ह्या राजकीय पक्षाची सुरुवात आत्ता नजीकच्या काळात नव्हे तर थेट स्वातंत्र्य पूर्व निजाम काळात १९२७ हैदराबादला झाली. मुसलमान समाजाचे संघटन, सशक्तीकरण असे साधे मुद्दे घेऊन नवाब मेहमूद नवाज खान यांच्या पुढाकाराने मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन या संघटनेची उभारणी केली गेली. ह्या संघटनेच्या स्थापनेला सातवा निजाम मीर उस्मान अली खान याचं समर्थन होतं असंही बोलल्या जातं, कारण ह्याच संघटनेच्या माध्यमातून आपली धार्मिक महत्वाकांक्षा निजाम राबवू शकणार होता. सुरुवातीला साधी उद्दिष्ट्ये घेऊन तयार झालेली ही संघटना नंतर मात्र अधिकाधिक कट्टर होत गेली ती १९३८ नंतर जेव्हा नवाब बहादूर यार जंग याच्याकडे ह्या संघटनेचं अध्यक्षपद आलं. ‘हैदराबाद हे मुस्लीम राज्य म्हणून घोषित झालं पाहिजे’,हैदराबाद चा निजाम हा भारतातीलं इतर सर्व राज्यकर्त्यापेक्षा उच्च ठरवून त्याला ब्रिटिशांनी ‘His Exalted Highness(HEH)’ ऐवजी ‘His Majesty’ ची पदवी द्यायला हवी अन निजामाला ‘दख्खन चा राजा’ घोषित करायला हवा अशा प्रकारच्या अवास्तव घोषणा बहादूर यार जंग ने देण्यास सुरुवात केली. त्याच्या ह्या विधानांना भुलून अगोदर निजाम उस्मान अली खान त्याच्यावर खुश होता, त्याकरिता मजलिस ला बरेच स्वातंत्र्य सुद्धा दिलं गेल होतं जेणेकरून ती संघटना अधिकाधिक धर्मांध होत गेली.

बहादूर यार अध्यक्ष असतानाच ह्या संघटनेत सामील झाला होता तो हैदराबाद च्या इतिहासातील सर्वात मोठा खलनायक. मूळ लातूरचा असलेला पण उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठातून पदवी केलेला कासीम रझवी. बहादूर यार च्या भाषणांमुळे भावूक होऊन कासीम रझवी मजलिस मध्ये सामील झाला, इतकेच नव्हे तर लातूर मध्ये आपल्या राहत्या घरात ह्या मजलिस चे कार्य सुरु करण्यापर्यंत त्याचा सहभाग वाढला होता. पुढे चालून १९४४ मध्ये मजलिसचा अध्यक्ष बहादूर यार जंग याचा विषारी हुक्का घेतल्या मुळे गूढ मृत्यू झाला, ह्या मृत्यू मागे निजामाचाच हात असल्याची शंका व्यक्त केली जात होती कारण मजलिसची शक्ती एवढी वाढली होती की आता की हैदराबादचे नियंत्रण निजाम कमी ह्या संघटनेतूनच जास्त होऊ लागले. निजामाला नसलेले लोकांचे समर्थन मजलिस ला मात्र भरपूर प्रमाणात मिळाले होते. बहादूर यार जंग च्या मृत्यू नंतर त्याचे अध्यक्षपद आले ते कासीम रझवी कडे आणि सुरुवात झाली एका अत्याचारांनी भरलेल्या काळ्या इतिहासाला!
कासीम रझवी नेतृत्वपदी येताच त्याने मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन ची एक सैनिक आघाडी देखील उघडली, अन त्याला नाव दिले ‘रझाकार’. ह्या रझाकारी बद्दल मराठवाड्यात तरी फारसे काही सांगायला नकोच, पाशवी अत्याचार ह्या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून कुठला शब्द तयार झाला असेल तर तो आहे ‘रझाकार’. कासीम रझवी हा दिसायला खुज्या, अंगाने कृश अन गर्दीत अजिबातच उठून न दिसू शकणाऱ्या प्रकृतीचा होता, पण शरीराने न मिळणारे उठावदार व्यक्तिमत्व त्याने आपल्या वाणीने भरून काढले होते. वाणी म्हणजे त्याची अत्यंत असंबद्ध, आक्रमक, अस्थिर अन असंतुलित भाषण पद्धती, कसलेही तर्क वितर्क नसलेले केवळ अशिक्षित सामान्य मुसलमानांना भडकावणारी भाषणे करून त्याने मोठा जन समुदाय आपल्या पाठी उभा केला होता. ह्या रझाकारी सैन्याला अफगाणिस्तानात तालिबान मध्ये करतात तसे युवकांना सहभागी करून, त्यांची माथी भडकावून प्रेरित करायचे, अन त्यांना सैनिकी प्रशिक्षण देऊन धार्मिक लढाई करण्यास तयार केले जात होते. १९४८ पर्यंत सुमारे २ लक्ष सैन्य ह्या रझवी ने रझाकारांच्या रुपात उभे केले होते.
एव्हाना ह्या रझवी अन रझाकार एम-आय-एम चा दबदबा इतका प्रचंड होता की खुद्द निजाम सुद्धा ह्या रझवी ला उत्तरे द्यायला घाबरत असे. निजामानेच पाळलेली ही सापाची औलाद आता त्यालाच संपवायला निघाली होती. रझाकारांची मर्दुमकी अशी वाढली की अगदी सामान्यातला सामान्य मुसलमान देखील स्वतःला राजा समजून इतरांशी व्यवहार करत होता. (रझाकारी अत्याचारांबद्दल इथे न लिहिता त्याची पुनश्चः माहिती देईनच.)

हैदराबाद व भारत सरकार मधील बोलणी सुरळीत होत नाहीत म्हणून ‘जैसे थे’ करार करायचे ठरले त्यातही हस्तक्षेप करत ह्या कासीम रझवीने हैदराबादच्या निजामातर्फे बोलणी करण्यासाठी जाणाऱ्या समिती मधील सदस्यांच्या घरावर मोर्चे करून, त्यांनाच जीवे मारण्याची धमकी देऊन तो करार देखील होऊ दिला नाही, अन वरून ‘लाल किल्ल्यावर निजामाचा असफजाही झेंडा फडकवू, बंगालचा उपसागर निजामाचे पाय धुण्यास येईल’ अशी अन ह्याहून भडकावणारी विधाने, थेट हिंदूंच्या कत्तली करण्याची विधाने तो भाषणामधून करत सुटला होता. आता गेल्या वर्षी अकबर-उद्दीन ओवेसी ने केलेलं विधानं म्हणजे ह्या कासीम रझवीचाच अजून एक नमुना होता.
ह्या रझाकारांच्या अत्याचारांचे स्तोम माजतेय हे पाहून सरदार पटेलांनी भारतीय सैन्याला हैदराबादवर चढाई करण्याची परवानगी दिली अन फक्त ४ दिवसांत हे काही शेकडा वर्ष जुनं साम्राज्य भारतीय सैन्यासमोर गारद झालं.

ओवेसी संबंध कुठून आला?

१९४८ साली, ऑपरेशन पोलो समाप्त होताच कासीम रझवीला तत्काळ अटक करून खटले चालवण्यात आले, त्याला तत्काळ शिक्षादेखील करण्यात अली, त्यात काही काळ हैदराबाद च्या चंचलगुडा व नंतर पुण्याच्या येरवडा मध्ये त्याला कैदेत ठेवले होते.१९४८ सालीच स्वतंत्र भारतात ह्या ‘एम-आय-एम’ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन वर बंदी घालण्यात अली होती ती बंदी पुढे १९५७ साली उठवली गेली.
१९५७ साली कासीम रझवी ह्याला तत्काळ पाकिस्तानात निघून जाण्याच्या अटीवर कैदेतून सोडण्यात आले. पण बाहेर येताच त्याने तत्काळ मजलिस प्रमुख सदस्यांची बैठक बोलावली. त्यात १४० पैकी केवळ ४० सदस्य उपस्थित होते. कासीम रझवी ने ह्या बैठकीत इतरांपुढे अध्यक्ष होऊन संघटना पुढे नेण्याचा पर्याय ठेवला, पण कुणीही पुढे आले नाही तेव्हा सर्वानुमते रझवीच्या मर्जीतील अब्दुल वाहेद ओवेसी यांना मजलिसचे अध्यक्षपद दिले गेले, अन अशा प्रकारे ओवेसी घराण्याकडे रझवीचा वारसा चालत आला. अब्दुल वाहेद ओवेसी नंतर त्यांचे पुत्र सलाह-उद्दीन अन तद्नंतर असद-उद्दीन असे घराणेशाहीने अध्यक्षपद चालत राहिले. रझाकारी नष्ट झाली, रझवी सुद्धा देशाबाहेर हाकलून दिल्या गेला पण त्याचा वारसा बहुधा आजही चालवण्याचा ठेका एमआयएम ने घेतला असावा.

कारण भडकाऊ वक्तव्यं करणं हे काही एम-आय-एम ला नवीन नाही. एमआयएम चा ताबा आपल्याकडे येताच अब्दुल वाहेद ओवेसी ने ह्या एमआयएम च्या नावात एक ‘ऑल इंडिया’ जोडून आत्ताचा AIMIM हा राजकीय पक्ष सुरु केला. त्यात पुनःश्च मुस्लीम समाजाला भडकावणारी भाषणे दिल्या संबंधी अब्दुल वाहेद ओवेसीला १४ मार्च १९५८ रोजी अटक करण्यात आली होती अन ११ महिने कारावासात काढावी लागली होती.
बहुधा अशीच भडकाऊ भाषणे देऊन इस्लाम धर्मी समाजाला एकत्र करण्याचा चंगच जणू एम-आय-एम चे ओवेसी घराणे करत आले त्यामुळे आत्ताच्या काळात देखील अकबर-उद्दीन ओवेसी आणि असद-उद्दीन ओवेसी हे बंधू देखील हाच राजकीय ‘फोर्मुला’ वापरत असावेत. कारण काही तथ्य नसलेली, सामाजिक सलोख्याला धरून नसलेली मनमानेल तशी विधानं करायची अन एका विशिष्ट समाजातल्या तरुणांची डोकी फितवायची त्यावर राजकारण करून आपणच कसे मुसलमानांचे तारणहार म्हणून राजकीय पोळ्या भाजायच्या, निवडणुका जिंकायच्या एवढेच बहुधा एमआयएम च्या इतिहासातच नव्हे वर्तमानात सुद्धा लिहिले आहे. आपण एमआयएम चे संकेतस्थळ तपासून पहा,ओवेसीने मुलाखतींमध्ये दिलेली उत्तरे तपासून पहा,कासीम रझवीला आपल्या इतिहासातून दडवण्याचा पुरेपूर प्रयत्न एमआयएम करते,पण मांजराने डोळे झाकून दूध पिले म्हणजे ते इतरांना दिसत नाही असे मुळीच नाही, इतिहासातील अनेक संदर्भ तपासले असता ही झाकली मूठ अपोआप उघडते हे स्पष्ट आहे, कासीम रझवी चा संबंध नाकारून पुन्हा त्याच्याच पावलावर पाउल टाकण्याने ओवेसी बंधू सुद्धा सामान्य भारतीयाच्या मनात खलनायकच ठरत आहेत.

(वरील माहिती करिता अनेक संदर्भ पुस्तके,वर्तमानपत्रे यांचा आधार घेतला आहे)

 

The post एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/history/%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%9a%e0%a4%be/feed/ 0 171
मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने http://ashutoshblog.in/history/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0/ http://ashutoshblog.in/history/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0/#comments Thu, 25 Feb 2016 17:47:11 +0000 http://ashutoshblog.in/?p=162 The post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.

समुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर…! सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला […]

The post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.

]]>
The post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.

समुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर…! सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला आला असल्याचे दाखवून दिलं,मार्सेलिस ची गगनभरारी,पंच महाभूतांपैकी एक असलेल्या त्या अथांग जल महाभूताला छेदून,सावरकरांनी घेतलेली ती भव्य झेप,इतिहासात अजरामर होऊन गेली, क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत “चातुर्या वाचून केलेला पराक्रम म्हणजे पशुचा गुण होतो” अन आपले हेच शब्द खरे करणारे कृत्य दिसले,त्या मार्सेलिसच्या गगनभरारीत…! ही वरकरणी जरी केवळ धैर्य अन धाडसाने भरलेली झेप वाटत असली तरी त्यात त्या गोष्टीचा पूर्व अभ्यास देखील महत्वाचा होता. आपल्याला जहाजातून नेले जाणार, ते जहाज मार्सेय अर्थात मार्सेलीस च्या बंदरावरून जाणार अन इथेच,इथेच ब्रिटीश सरकारला अडचणीत आणता येऊ शकते याची पूर्ण कल्पना सावरकरांच्या डोक्यात होती. कारण मार्सेलिस म्हणजे फ्रांस, अन फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटीश पोलिसांना काडीचीही किंमत नाही,त्या भूमीवर ते आपल्याला अटक करू शकत नाही,म्हणजे आपण सहजासहजी निसटू शकतो,तेव्हा आपण काहीतरी करून मार्सेलिस मध्ये जहाजावरून पलायन करून आपली सुटका करून घेऊ शकतो,अन ब्रिटीश पोलिसांना हातावर हात ठेऊन घडत्या गोष्टी बघत राहण्या पलीकडे काही करता येणार नाही, ही ती अद्वितीय योजना,हेच ते चातुर्य जे ह्या धाडसा पूर्वी अत्यंत निष्णातपणे योजलं होतं.

झाले तर मग,ठरले भारतमातेसमर्पीत हे धाडस करायचेच,

भारतात पाठवणी होण्याअगोदर सावरकरांच्या भेटी आलेल्या त्यांच्या सहकार्यांना ‘शक्य झाले तर लवकरच मार्सेय ला भेटू’ असा संदेश वजा कल्पना देउन झाली,सहकारी आचार्य काय ते समजून चुकले, अन ८ जुलै,तो शतकांतुन एक येणारा पराक्रमाचा दिवस उजाडला,8 जुलै रोजी सकाळीच बंदिवासातील सावरकरांना भारताच्या दिशेने घेऊन निघालेले एस एस मोरिया ही बोट फ्रांस च्या मार्सेय बंदराजवळ खलबत घालून उभे होते.त्यावेळी हीच योग्य संधी आहे हे लक्षात घेऊन सावरकरांनी योजना डोक्यात चालवली.त्यांनी पोलिसास शौचालयात जाण्याची परवानगी मागितली.ती त्यांना दिली गेली.

शौचालयात भिंतीच्या वरच्या बाजूस एक पोर्ट होल अर्थात समुद्राच्या बाजूने उघडणारी एक खिडकी ज्यात एक माणूस कसाबसा मावू शकेल असे पोर्ट होल होते.याच पोर्ट होल मधून निसटण्याचा निश्चय सावरकरांनी केला.सहा साडेसहा फुट उंचीवर असलेलं ते पोर्ट होल चढण्यास सोपे तर अजिबात नव्हते,आधीच उंच त्यात सरपटतच बाहेर पडायचे अन पलीकडे अथांग समुद्र,हे म्हणजे वाटते तितके सोपे काम नक्कीच नव्हते,अत्यंत धाडसाचे अन तेवढेच जोखमीचे कारण उडी थोडी जरी चुकली तरी बोटीच्या खालून बाहेर आलेल्या राम्पवर डोके आपटून थेट मृत्यू ओढवू शकला असता,हे कितीही जोखमीचे काम असले तरी ते आव्हान पेलणारा कुणी साधा सुधा मनुष्य नव्हता,राष्ट्रासाठी थेट मृत्युलाच आव्हान देण्याची हिम्मत करणारा विनायक दामोदर सावरकर होता !

योजना तर आखली अन तत्काळ अंमलबजावणी,शौचालयाच्या दारावर,जिथून बाहेर उभे पोलीस आतल्या कैद्यावर लक्ष ठेऊ शकत होते त्या दारच्या खाचेवर सावरकरांनी कपडे अडकवून ठेअले जेणेकरून पोलिसांना आतले काही दिसणार नाही, अन बघता बघता सावरकर त्या साडेसहा फुट उंच पोर्ट होल च्या खिडकीत चढले अन बाहेरच्या बाजूस सरकून पुढच्या क्षणात खालचा राम्प चुकवत झेपावले,ते थेट त्या मार्सेलिस च्या अथांग समुद्रात! हीच टी उत्तुंग भरारी,वरकरणी एका राजकीय कैद्याचे पलायन म्हणवली जाणारी झेप,जिने इतिहास घडवला,अख्ख्या जगात जी बराच काळ चर्चेचा विषय बनून राहिली,पण इथेच हे शौर्य संपत नाही,खरा पराक्रम तर पुढची अनेक आव्हाने पार करुन सुखरूप फ्रान्सच्या च्या किनाऱ्यावर पोहोचण्यात होता.

एव्हाना सावरकर निसटले ही खबर पोलिसांना मिळालीच होती कारण शौचालयात खूप वेळ लागतो आहे म्हणून दार तोडून आत आलेल्या पोलिसाने सावरकरांचे पाय पोर्टहोल मधून बाहेर पडताना पहिले होते,लगोलग पोलिसांनी बोटीवरून सावरकरांच्या दिशेने गोळीबार सुरु केला,छोट्या होड्या देखील पाण्यात उतरवण्यास तयार केल्या,पण त्यांना पाठलाग करायचा होता तो सावरकर नामक असामान्य धैर्याच्या भारतीय क्रांतिकारकाचा, जहाजापासून फ्रान्सच्या मार्सेलिस किनाऱ्याचे अंतर सुमारे ५०० यार्ड सावरकरांनी ते समुद्र पोहत पार केलेच,पण त्याहून मोठे आव्हान होते,समोर किनार्‍याला लागून भिंत उभी ठाकली होती,8 फुट उंच आणि गुळगुळीत दगडाची,मागाहून येत असलेले पोलीस अन त्या समुद्राच्या थंड पाण्यात देह भिजलेला,विचार करवत नाही की त्या असामान्य देहाला कित्येक यातना होत असाव्यात,पण हा महामानव जो मृत्यूला कधी घाबरला नाही,अन संसाराची राखरांगोळी करून देशप्रेमापोटी सर्वस्व अर्पिलेला तो क्रांतिसूर्य ती भिंत कशी काय जणू ती सुद्धा पार करून फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचला.हे एक अचाट शौर्य होतं,ह्या बद्दल लिहावे तेवढे थोडेच अत्यंत निष्णात पाने योजना आखून ती तडीस नेणारा क्रांतिवीर आता फ्रान्सच्या भूमीवर कैदी नव्हता,मुक्त होता,इथे त्याला ते ब्रिटीश पोलीस हातही लावू शकणार नव्हते,पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते,थोड्याच वेळात ब्रिटीश पोलीस किनाऱ्यावर पोहोचले,अन सावरकरांचा पाठलाग सुरु केला,सावरकरही धीराने धावत सुटले कारण योजनेचा दुसरा भाग,इंग्लंड मधील त्यांचे सहकारी शामजी कॄष्ण वर्मा आणि मॅडम कामा त्यांना येऊन मदत करणार होते,पण त्यांना पोहोचायला नेमका उशीर झाला होता,त्यात सावरकरांना फ्रान्सच्या पोलिसांनी अडवले,सावरकरांनी इंग्रजी मध्ये त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण पोलिसांना ते समजेना त्यात ब्रिटीश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना थोडीफार लाच देऊन सावरकरांचा ताबा घेतला,फ्रान्सच्या भूमीवर अनधिकृतपणे सावरकरांना अटक केले,व परत मोरिया बोटीवर आणले गेले.

सावरकरांचा हा पराक्रम किंचित अपयशी वाटत असला तरी यातून अनेक गोष्टी साध्य केल्या गेल्या,ब्रिटीश सरकारची प्रचंड प्रमाणात छी-थू केल्या गेली,ब्रिटीश सरकार भारता प्रती कसे अनैतिक कार्य करते आहे हे जगापुढे आले,जगभरातील वृत्तपत्रांत या महापराक्रमी उडीचे वर्णनं छापली गेली,प्रकरण हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले,परकीय देशाच्या एकट्या पुरुषा मुळे दोन राष्ट्रांत भांडणे लागण्याचे दुसरे कुठलेही उदाहरण इतिहासात सापडणार नाही,काहीजण तर असेही म्हणतात की सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा होऊन जेव्हा भारतातून बोटी द्वारे अंदमानात पाठवले जात होते त्यावेळी फ्रान्सची एक पाणबुडी सावरकरांच्या बोटी मागून पाठवली गेली, कारण फ्रान्सला असे वाटत होते की ह्या मानवाची शाश्वती नाही,कदाचित हा मनुष्य पुन्हा बोटीवरून समुद्रात झेपावेल अन आपण त्याला परत मुक्त करून फ्रान्समध्ये आणू.

अखंड विश्वात खळबळ माजवणारे हे असामान्य शौर्य करू शकणारा हा सुपुत्र भारतमातेला लाभला,इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये हा व्यक्ति आपल्याला शत्रू म्हणून लाभला याकरिता आभार व्यक्त केले जातात हे थोडे थोडके नव्हेच. अशा या अचाट कामगिरी निभावलेल्या क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिवस. आपल्या ‘अनादी मी अनंत मी’ मध्ये सावरकर लिहितात त्याप्रमाणे खरोखरच ‘भिऊनि मला भ्याड मृत्यू’ पळत सुटावा,असे ओजस्वी पराक्रमी अचाट साहसी आयुष्य घालवलेले सावरकर,त्या आयुष्यातला क्षण अन क्षण देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अश्या या वीर पुरुषाकडून आपण शिकावे तेवढे थोडेच. अगदी १५ व्या वर्षी लिहिलेले स्वातंत्र्याचे स्तोत्र असो,भारतातच काय पण इंग्रजांच्या घरात राहून केलेली क्रांती असो,त्यांचे लेखन असो,वर उल्लेखलेली ती मार्सेलिसची जगप्रसिद्ध उडी,त्यांची काळ्यापाण्याची शिक्षा किंवा त्या नंतर केलेले समाजसुधारणा कार्य या वीर पुरुषाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाने सूर्याप्रमाणे तळपत हिंदुस्थान राष्ट्राला प्रकाशमान करण्याचे काम सदैव केले.या क्रांतीसुर्य सावरकरांबद्दल आपण काही लिहावे म्हणजे त्या सूर्यासमोर आपण आपली एक पणती घेऊन बसण्यासारखे आहे.हा क्रांतिसूर्य आमच्या मनामनातून सदैव असाच तळपत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

The post मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/history/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0/feed/ 1 162
जॅक्सन चा वध http://ashutoshblog.in/history/%e0%a4%9c%e0%a5%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%a7-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87-jackson-kanhere/ http://ashutoshblog.in/history/%e0%a4%9c%e0%a5%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%a7-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87-jackson-kanhere/#comments Mon, 21 Dec 2015 07:56:29 +0000 http://ashutoshblog.in/?p=114 The post जॅक्सन चा वध appeared first on आशुतोष.

जॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे   २१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन […]

The post जॅक्सन चा वध appeared first on आशुतोष.

]]>
The post जॅक्सन चा वध appeared first on आशुतोष.

जॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे

 

२१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन व्यक्ती त्या जॅक्सनसाठी,त्याची वाट पाहत नाट्यगृहात थांबल्या होत्या.

जॅक्सनला यायला उशीर होतोय म्हणून जरा बेचैन झालेला तो तरुण जॅक्सनसाठी राखीव ठेवलेल्या खुर्ची मागेच बसला होता.पडदे उघडले,नाटकाची नांदीहि झाली अन इतक्यात उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करत तो नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन आला.अन पाहुण्याच्या जागी समोरच्या रांगेत स्थानापन्न झाला.अगदी तयारीनिशी आलेल्या त्या तीन व्यक्तीही त्याला आलेला पाहून सुखावल्या,कारणही तसेच होते,त्या व्यक्ती आल्या होत्या, जॅक्सनचा वध करायला.त्या तीन व्यक्ती म्हणजे अभिनव भारतचे देशप्रेमाने ओतप्रोत भारलेले तरुण,विनायकराव देशपांडे,अण्णा कर्वे अन त्यातला अगदी लहान,उण्यापुऱ्या १९ वर्षांचा,तो तेजस्वी चेहऱ्याचा तरुण,अनंत लक्ष्मण कान्हेरे…!

बाबाराव सावरकरांना दिलेल्या काळ्यापाण्याच्या शिक्षेचा बदला हे एकमेव उद्दिष्ट घेऊन निघालेले अभिनव भारत चे ते क्रांतिकारक तरुण.भारतमातेला ह्या पापी इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्याची शपथ घेतलेले ते तरुण,इंग्रज सरकारने बाबारावांना केलेल्या शिक्षेचा राग मनात घेऊन,त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आज सिद्ध जाहले होते.

बाबाराव सावरकरांचा ह्या जॅक्सनने केलेला अपमान,टांगेवाल्याला चाबकाचे फटके देऊनही त्या विल्यम ला सहीसलामत सोडणारा हा जॅक्सन,स्वातंत्र्याप्रती तरुणांना प्रेरित करणाऱ्या तांबे शास्त्रींना अडकवणारा हा जॅक्सन,बाबासाहेब खरेंची वकिली सनद रद्द करून त्यांना कारागृहात धाडणारा हा जॅक्सन,वंदे मातरम गाणाऱ्या तरुणांवर खटले चालवणारा हा जॅक्सन, हा जॅक्सन गुन्हेगार ठरला होता,भारतमातेचा गुन्हेगार..! अन त्याचा प्रतिशोध घेण्याचा हा दिवस होता.काट्यानेच काटा काढायचा या वृत्तीच्या या तरुणांनी ही जॅक्सनच्या हत्येची व्यवस्थित योजना आखून,आता तिच्या अंमलबजावणीची वेळ होती.त्या कोवळ्या वयाच्या तरुणाने मनाशी केलेला निश्चय,औरंगाबादेत असताना गंगाराम मारवाड्या समोर जळता काचेचा कंदील हातात घेऊन केलेली भारतमातेच्या रक्षणाची शपथ आज पूर्ण करण्याची वेळ आली होती.अनंत लक्ष्मण कान्हेरे,हा चित्रकलेचा विद्यार्थी पण एरव्ही कुंचल्यावरून फिरणारी ती बोटं आज पिस्तुलाचा चाप ओढणार होती,कारण भारतमातेच्या या पुत्राचे ते कर्तव्यच असे तो समजत होता.

तिकडे मंचावर कोदंडरुपातले जोगळेकर “नामे ब्राह्मण खरा असे हा…” म्हणत प्रवेश करणार इतक्यात मंचासमोरून धाड धाड असे एकामागून एक गोळ्यांचे आवाज झाले,अन नाशिकचा तो दृष्ट जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.मागे बसलेल्या त्या क्रांतिकारी तरुणाने सुरवातीस एक गोळी आपल्या पिस्तुलाने पाठीमागूनच जॅक्सनवर झाडली पण ती चुकली म्हणून समोर येऊन पुन्हा चार गोळ्या झाडून त्या पापी इंग्रजाचा अंत ह्या तरुणाने केला. गोळ्यांचे आवाज ऐकता हा हा कल्लोळ माजला,अन तितक्यात विनायकराव देशपांडे आणि अण्णा कर्वे सभागृहातून बाहेर पडले,पण हा अनंत कान्हेरे,त्याचा उद्देश वेगळाच,त्याने दुसरेही पिस्तुल काढले आणि स्वतःच्या मस्तकी धरले,स्वतःलाही संपवण्याचा त्याचा प्रयत्न मात्र फसला,गोळी चालवण्याआधीच शेजारी उभ्या अधिकाऱ्याने त्याचा हात पकडून त्याला अटकाव केला.पुढे खटला चालला,गणू वैद्याच्या भित्रेपणामुळे इतरही साथीदार पकडले गेले,अनंत कान्हेरे,विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशीही दिल्या गेली.

जॅक्सन वध पश्चात अनंत कान्हेरे यांस फाशी दिले जाण्यापूर्वी काढलेले हे छायाचित्र
अनंत कान्हेरे यांस फाशी दिले जाण्यापूर्वी काढलेले हे छायाचित्र (सौजन्य सावरकर संकेतस्थळ )

आपल्या कर्तुत्वाने त्या जॅक्सन चा वध करणारा हा केवळ १९ वर्षांचा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे इतिहासात अजरामर झाला.अनंत कान्हेरे सारखे वीरपुत्र जिच्या उदरात जन्मले अशी आपली भारतमाता आपल्या पुत्रांच्या कर्तुत्वाने पवित्र झाली,भारतमातेच्या प्रेमापोटी प्राणांची आहुती देणारे असे थोर क्रांतीकारक आपल्या मनांतून अन रक्तातून सदैव जिवंत राहायला हवेत.आज २१ डिसेंबर, जॅक्सन वधाच्या घटनेचे स्मरण करून आपण या वीराला अभिवादन करूया.

The post जॅक्सन चा वध appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/history/%e0%a4%9c%e0%a5%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%a7-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87-jackson-kanhere/feed/ 2 114
बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक http://ashutoshblog.in/history/%e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4-batukeshvar-datt/ http://ashutoshblog.in/history/%e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4-batukeshvar-datt/#respond Wed, 18 Nov 2015 08:38:59 +0000 http://ashutoshblog.in/?p=104 The post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.

भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले?) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र […]

The post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.

]]>
The post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.

भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले?) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र क्रांती केलेल्या तरुणांच्या यादीत आम्ही एकवेळ भगतसिंह व त्यांच्या सोबत राजगुरू,सुखदेवांना वर्षातून एकदा मार्च मध्ये आठवण काढतो,पण असे कित्येक क्रांतिकारक होऊन गेले ज्यांच्यावर इतिहासात एक पानभर माहिती सुद्धा नशिबात आली नाही.
पंजाबात एक हुसैनीवाला म्हणून ठिकाण आहे.होय जिथे भगतसिंह,राजगुरू अन सुखदेव यांची स्मृतीस्थाने आहेत,पण त्याच हुसैनीवाला मध्ये आणखी एका व्यक्ती चे स्मृतीस्थळ आहे ते म्हणजे बटुकेश्वर दत्त‘.
शालेय इतिहासाच्या पुस्तकात अवघ्या अडीच पानात संपलेल्या सशस्त्र क्रांतीच्या पाठात बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंह यांनी दिल्लीत केंद्रीय संसदेत बॉम्बस्फोट घडवून आणला,त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालीएवढी एक ओळ काय ती बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला आली.त्यावेळी दोन मार्क मिळावेत म्हणून इतिहासाची हि ओळ तोंडपाठ केलेल्या आम्हाला बटुकेश्वर दत्त आणि संसदेतला बॉम्बस्फोट एवढीच काय ती ओळख.किंबहुना शालेय विद्यार्थ्यांना याच्या पुढची ओळख करून देण्याची गरज बहुदा पुस्तक लिहिणाऱ्या मंडळाला वाटली नसावी.पारतंत्र्यात ब्रिटीश सरकार कडून काळ्या पाण्याच्या शिक्षेवर अंदमानात धाडलेल्या या तरुण क्रांतीविराला स्वातंत्र्यात मायभूमीत झेलाव्या लागलेल्या मरणयातना जास्त वेदनादायक आहेत.
बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० मध्ये बंगाल मधील ओरी गावात झाला होता.यांचे वडील गोष्ठ बिहारी हे कानपूर मध्ये नौकरी करत असल्याने ते कानपूर मध्ये राहत असत.१९२४२५ च्या सुमारास बटुकेश्वर दत्त यांचे मॅट्रिक चे शिक्षण झाले त्यावेळी त्यांच्या आई व वडिलांचे निधन झाले होते.या नंतर कानपूर च्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनया क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.
बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटा मुळे.तत्कालीन ब्रिटीश सरकारने पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिलनावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला.या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला.अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.

बटुकेश्वर-दत्त-बॉम्बस्फोट

या सर्व घटनेत दोषी म्हणून भगतसिंह व बटुकेश्वर दत्त या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याच वेळी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला म्हणून केलेल्या सॉंडर्स हत्येच्या लाहोर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन भगतसिंह यांना फाशीची शिक्षा झाली तर बटुकेश्वर दत्त यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
याही बाबतीत आपल्याला फाशी झाली नाही म्हणून बटुकेश्वर दत्त दुःखी होत, परंतु भगतसिंहानी त्यांची आत्महत्या म्हणजे पारतंत्र्यातून मुक्तीचा मार्ग नव्हे, क्रांतिकारकांनी हे दाखवून दिले पाहिजे कि ते फासावर लटकूनच नाही तर जिवंतपणी कारागृहात मरणयातना भोगून सुद्धा लढा देत असतातअशा शब्दात त्यांची समजूत घातली.
पुढे अंदमान च्या कारागृहात १९३३ व १९३७ साली उपोषण करून त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठावाला,परंतु १९३८ साली महात्मा गांधींच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले.अंदमानच्या कारागृहात क्षयरोगाने जर्जर झालेले असताना देखील बाहेर येताच त्यांनी आपले क्रांतिकार्य पुनःश्च सुरु केले अन १९४२ साली त्यांनी असहकार्य चळवळीत त्यांनी उडी घेताच त्यांना ४ वर्षांकरिता पुन्हा कारागृहात डांबले गेले. नंतर स्वातंत्र्याच्या अगदी थोडे आधी १९४५ साली त्यांची मुक्तता करण्यात आली.
नंतर पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला,पण भगतसिंहां च्या खांद्याला खांदा लावून क्रांतिकार्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या या तरुणाच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली. स्वातंत्र्यप्राप्ती पश्चात बटुकेश्वर दत्त यांनी १९४७ साली विवाह करून पटना येथे ते स्थायिक झाले.
पुढच्या काळात त्यांनी बिस्किटांची छोटी बेकरी सुरु केली मात्र अल्पावधीतच ती नुकसानीत जाऊन बंद पडली.तदनंतर सिगारेट कंपनीची डीलरशिप घेऊन पाटण्याच्या रस्त्यावर फिरण्याची वेळ या क्रांतिकारकावर आली.मोठ्या धाडसाने संसदेत बॉम्बस्फोट करणारा हा क्रांतिवीर दुर्लक्षितच राहिला.
हे कमी म्हणून कि काय,परिस्थिती इतकी बिकट झाली शेवटी पटना परिवहन विभागात एक साधी नौकरी अन पुढे चालून पुनश्च पाटण्याच्या रस्त्यांवर पर्यटन गाईड म्हणून बटुकेश्वर दत्त फिरत राहिले.
ब्रिटीश सरकारला हादरे देणारे सशस्त्र हल्ले करून तिकडे गोऱ्यांची झोप उडवणारे बटुकेश्वर दत्त आपल्या भारतमातेच्या स्वतंत्र भूमीत आपल्याच सरकार कडून मात्र वंचित राहिले.
एक कहाणी तर अशीही सांगितली जाते, एकदा पटना शहरात बस चे परमिट वाटण्यात येणार होते,त्यावेळी बटुकेश्वर दत्तांनिही त्याकरिता अर्ज केला. परंतु स्थानिक आयुक्ताने बटुकेश्वरांकडे आपले स्वातंत्र्य सैनिक असल्याचा पुरावा घेऊन या अशी मागणी केली.इतका अपमान वाट्याला येणे म्हणजे अशा थोर क्रांतीकारकांनि भारतमातेच्या पोटी जन्म घेऊन मोठीच चूक केली असे म्हणावयास हरकत नाही,
पण ही उपासमार,वंचना इथवर थांबली नाही, १९६४ साली कसल्याश्या आजाराने त्रस्त हा क्रांतिवीर पाटण्याच्या सरकारी दवाखान्यात खितपत पडला होता,शेवटी त्यांचे आझाद नावाचे मित्र यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून या उपेक्षेविरुद्ध आवाज उठावाला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली,पण तोवर वेळ निघून गेली होती.त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावेहि खंत त्यांनी बोलून दाखवली.
पण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह,सुखदेव,राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली आपले प्राण त्यागले.

भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता घरादारावर तुळशीपत्रे ठेऊन सशस्त्र उठाव करणाऱ्या या तरुणांना स्वतंत्र भारतात मात्र किती हाल अपेष्टा अन उपेक्षा सोसाव्या लागल्या.काही मोजके क्रांतिकारक सोडले तर इतरांचे कर्तुत्व इतिहासात दोन ओळीत लिहून संपविल्या गेले.असे शेकडो हजारो क्रांतिकारक असावेत ज्यांच्या वाटेला एक ओळही पुस्तकात येऊ नये,हे आपल्या स्वतंत्र भारताचे दुर्दैव म्हणूया.जिवंतपणी उपेक्षा मिळालेल्या या सर्व वीरांचे प्रतिक म्हणून बटुकेश्वर दत्त यांच्याकडे पाहता येईल,जिवंतपणी उपेक्षा अन मरणानंतर मात्र यांचं इतिहासातलं पार अस्तित्वच नष्ट करण्यात आले आहे.
२०१० साली बटुकेश्वर दत्त यांचे जन्म शताब्दी वर्ष होऊन गेले पण क्वचितच कुणाला त्यांची आठवण झाली असावी.त्यांच्यावर अनिल वर्मा यांनी लिहिलेले एक पुस्तक अन बिहार सरकार ने तीन महिन्याकरिता दिलेले विधान परिषदेचे सदस्यपद या व्यतिरिक्त बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला काहीही आले नाही.
आज १८ नोव्हेंबर बटुकेश्वर दत्त यांची जयंती त्यानिमित्त हा लेख प्रपंच.अशा विस्मृतीत गेलेल्या थोर वीर पुरुषांना उजेडात आणण्याचे कार्य सदैव करत राहूया.

The post बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/history/%e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4-batukeshvar-datt/feed/ 0 104
निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ http://ashutoshblog.in/history/hyderabad-nizam-surrenders-operation-polo-completes/ http://ashutoshblog.in/history/hyderabad-nizam-surrenders-operation-polo-completes/#respond Thu, 17 Sep 2015 13:18:52 +0000 http://ashutoshblog.in/?p=49 The post निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ appeared first on आशुतोष.

The post निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ appeared first on आशुतोष.

]]>
The post निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ appeared first on आशुतोष.

The post निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/history/hyderabad-nizam-surrenders-operation-polo-completes/feed/ 0 49
१३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम http://ashutoshblog.in/history/marathwada-muktisangram/ http://ashutoshblog.in/history/marathwada-muktisangram/#comments Sun, 13 Sep 2015 08:00:20 +0000 http://ashutoshblog.in/?p=6 The post १३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम appeared first on आशुतोष.

१३ सप्टेंबर १९४८ १३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार खुले झाले तो हा दिवस.औरंगाबाद शहरापासून केवळ १०० कि.मी. अंतरावर वर्षांपासूनच स्वातंत्र्याचे वारे वाहिले असताना औरंगाबाद व मराठवाडा मात्र अजूनही निजामी अत्याचाराच्या पारतंत्र्यात खितपत होता.निजाम […]

The post १३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम appeared first on आशुतोष.

]]>
The post १३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम appeared first on आशुतोष.

१३ सप्टेंबर १९४८

१३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार खुले झाले तो हा दिवस.औरंगाबाद शहरापासून केवळ १०० कि.मी. अंतरावर वर्षांपासूनच स्वातंत्र्याचे वारे वाहिले असताना औरंगाबाद व मराठवाडा मात्र अजूनही निजामी अत्याचाराच्या पारतंत्र्यात खितपत होता.निजाम कमी म्हणून काय आता कासीम रझवीचे हैवान रझाकार देखील सामान्य जनतेला पिडत होते.त्यात निजामाने भारतीय संघराज्यात सामील होण्या ऐवजी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला,त्या उपर ह्या कासीम रझवीच्या भडकाऊ वल्गना यामुळे वातावरण अत्यंत कलुषित होत गेलं.हैदराबाद च्या निजामाला दूर सारून तो आपल्या ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहणारा हा कासीम रझवी आणि त्याचे अत्याचारी रझाकार आता हैदराबाद वर निजामाचे नसून रझवीचेच राज्य असल्याप्रमाणे वागत होते.हिंदू जनतेवर मनमानी अत्याचार सुरु करण्याचे आदेश रझवीने देताच सरदार पटेल खवळले अन तत्काळ पोलीस कारवाईला आरंभ केल्या गेला.
आधीच तयारीत असलेले भारतीय सैन्य चहूबाजूंनी हैदराबाद राज्यावर चाल करून गेले.सोलापुरातील नळदुर्ग व विजयवाडा येथून दोन मुख्य हल्ले तर बाकी चहुबाजूनी छोटे हल्ले करत तयारीचे भारतीय सैन्य निजामी संस्थानात घुसले.औरंगाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरील देऊळगाव, नांदगाव, अजिंठा, चाळीसगाव, टोका, वैजापूर इत्यादी बाजूंनी भारतीय सैन्य रझाकारांच्या सरहद्दीत घुसले. इकडे रागाच्या भरात कसलीही तयारी नसलेले काही शेकडा रझाकार विद्यार्थी,त्यांचा म्होरक्या सय्यद बिलग्रामी ने वैजापूरच्या दिशेने धाडले.माळीवाडा जवळ झाडाझुडपात लपून यांनी दगडधोंडे फेकून भारतीय सैन्याचा हास्यस्पद प्रतिकार केला,लष्कराने विनंती करूनही न ऐकल्याने काही वेळातच हे इस्लामधर्मी तरुण हकनाक मारल्या गेले.

काही वेळात भारतीय सैन्य गावे दर गावे करत औरंगाबाद शहरात दाखल झाले,औरंगाबाद शहरातील बिलग्रामी,प्रो. इब्राहीम सह सर्व रझाकारी नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आला, हर्सुलचा तलाव,मध्यवर्ती कारागृह,नवखंडा,सुभेदारी,शहागंज आदि सर्वच ठिकाणी आता तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला गेला,औरंगाबाद स्थित निजाम रेडियो च्या केंद्रावरून वंदे मातरमचे सूर कानी पडू लागले,सर्वत्र भारतीय सैन्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले गेले,आनंदीआनंद पसरला.
हि १३ सप्टेंबरची सकाळ सोन्याची सकाळ होती,मराठवाड्याचा एक मोठा भूभाग निजामाच्या अन कासीम रझवीच्या अत्याचारातून आता कायमचा मुक्त झाला होता,अन्यायाची काळी छाया दूर होऊन स्वतंत्र भारताची सोनेरी पहाट आता उगवली होती…!
आजचे पहा उद्याचा कशाला विचार करताअसल्या विचारधारेच्या निजामाने कधी स्वप्नातही आपल्या जनतेचा विचार केला,पुढे सरकणाऱ्या काळाचा,बदललेल्या वाऱ्यांचा जराही विचार केला नाही,अन शेकडो वर्षांपासून सुरु असलेली आपली भव्य सत्ता फक्त चार दिवसांत धुळीस मिळवली.१३ सप्टेंबर रोजी अवघ्या काही तासांत मराठवाड्याच्या मोठा भूभागावर भारतीय सैन्याने ताबा मिळवला व पुढच्या ३ दिवसात निजामाला शरण येण्यावाचून पर्याय उरला नाही.

The post १३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम appeared first on आशुतोष.

]]>
http://ashutoshblog.in/history/marathwada-muktisangram/feed/ 2 6