सारोळा वनपर्यटन

जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्या अन देवगिरी किल्ल्या सारखे अनेक ऐतिहासिक वारसे लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात तशी निसर्गरम्य ठिकाणांची अजिबात कमतरता नाही.म्हैसमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहेच,पण याच्या जोडीला एक नवीन वनपर्यटन स्थळ म्हणून समोर येऊ शकते ते म्हणजे सारोळा (Sarola). औरंगाबाद शहरापासून अगदी जवळच असलेलं डोंगरांच्या कुशीत वसलेलं अन गर्द वनात लपलेलं सारोळा हे अगदीच […]

निजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ

१३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम

१३ सप्टेंबर १९४८ १३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार खुले झाले तो हा दिवस.औरंगाबाद शहरापासून केवळ १०० कि.मी. अंतरावर वर्षांपासूनच स्वातंत्र्याचे वारे वाहिले असताना औरंगाबाद व मराठवाडा मात्र अजूनही निजामी अत्याचाराच्या पारतंत्र्यात खितपत होता.निजाम […]

लोकमान्य टिळक

आज 23 जुलै,म्हणजे लोकमान्य टिळकांची जयंती,अहो जयंती म्हणण्यापेक्षा याला फक्त टिळकांची आठवण काढण्याचा दिवस म्हणुया! आज ठिकठिकाणी टिळकांच्या फोटोंना हार घातले जातील,शेंगांच्या टरफलांची गोष्ट सांगतील, पण हीच गोष्ट सांगणारी अन आजकाल काहिही ‘खाणारी’ मंडळी ती टरफलंतरी सोडतील की नाही ही शंकाच आहे, कधी काळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ म्हणणारे टिळक, गरीबांची संपत्ती लुबाडुन […]

भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर

आपल्या निबंधामालेतून महाराष्ट्र राज्यात तेजस्वी राजकीय विचारांचा उगम घडवणाऱ्या भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची आज जयंती. ‘निबंधमाला’ या आपल्या लेखमालेतून त्यांनी ८४ विविध विषयांवर लिहिलेले लेख आजही प्रसिद्ध आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जयंती निमित्त आदरयुक्त अभिवादन. २० मे १८५० रोजी जन्मलेला या अवलिया ने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सोबत देशात क्रांती […]

वीर बाजीराव पेशवे

वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळून पुढील केवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत ३५ लढाया खेळलेला आणि त्या सर्वच जिंकलेला ‘अपराजित’ ‘अजिंक्य’ योद्धा वीर बाजीराव पेशवे. भारताच्या इतिहासात इतक्या संख्येने लढाया खेळून त्यात एकही न हरणारा हा एकमेव पराक्रमी. आपल्या अद्वितीय युद्धकौशल्य च्या बळावर दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणणारा हा पराक्रमी…! ‘जीवाची […]

पराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे

पराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वतःचे आयुष्य भारतमातेसाठी वाहून देणाऱ्या युवकांपैकी एक अनंत कान्हेरे. केवळ १९ वर्षांच्या आपल्या आयुष्यात सर्वांनाच थक्क करेल आणि युवकांना प्रेरणा देईल असे कर्तुत्व गाजवणाऱ्या अनंत कान्हेरेंचा आज स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती देऊन यज्ञकुंड प्रज्वलित ठेवण्याचे महान कार्य करणाऱ्या अनेकानेक क्रांतीकारांपैकी ज्यांचे नाव प्रामुख्याने घेतले […]

क्रांतिकारी मंगल पांडे

क्रांतिकारी मंगल पांडे आज ८ एप्रिल, भारताच्या इतिहासात क्रांतीची बीजे रोवणाऱ्या क्रांतिकारी मंगल पांडे यांचा बलिदान दिवस. ज्यांच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशी म्हण असलेल्या इंग्रजांच्या पतनाचा सूर्य बनून आलेल्या मंगल पांडे यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवून दिली. २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडेच्या बंदुकीतून निघालेल्या त्या गोळीने संपूर्ण उत्तर भारताला इंग्रजांच्या विरोधात उभे […]

ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी

ATM FRAUD(FAKE INQUIRY CALLS) काल दुपारी अचानक एका अनोळखी number वरून फोन आला.उचलला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण “भारतीय रिझर्व बँकेतून” बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या ATM कार्ड चे Verification करण्याकरिता संपर्क केल्याचे तो सांगत होता.त्याने संपर्क केलेला क्रमांक, त्याला माझ्याबद्दल नसलेली माहिती ह्या वरून मला त्या व्यक्तीवर संशय आला व मी त्याला खोलात जाऊन […]

व्हॉट्सअॅप ग्रुप

आजकाल फेसबुक वर एक नवीनच trend पाहायला मिळतोय. कुणीतरी एक जण येतो (विशेषता फेसबूक ग्रूप वर) आणि आपण ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ काढू म्हणत सर्वाना mobile क्रमांक देण्याची विनंती करतो, आणि त्याच्या विनंती ला साद देत १५०-२०० सदस्य बिनधास्त क्रमांक देऊन टाकतात. सर्व जण आपला क्रमांक देतात खरे पण ह्या प्रकारातून निर्माण होणारया धोक्यांकडे कुणीही लक्ष देत […]