फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल…

फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… गेल्या काही दिवसात फेसबुक ग्रुप येणाऱ्या पहावल्या न जाणाऱ्या अश्लील पोस्ट्स बद्दल सातत्याने तक्रारी येत आहेत,अचानक कुठूनतरी टोळधाड यावी अन सर्वांना त्रस्त करून सोडावं तसं ह्या पोस्ट्स नी सगळ्या ग्रुप्स वर उच्छाद मांडून ठेवला आहे. अगदी सज्जन वृत्तीच्या,समाजात चांगलं स्थान असलेल्या व्यक्तींच्या फेसबुक खात्यावरून सुद्धा अनेकदा अशा पोस्ट […]

मार्सेलिस – स्वा.सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण दिवस निमित्ताने

समुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर…! सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला […]

अग्निकन्या बीना दास

अग्निकन्या – बीना दास

६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्या वर! यात तो इंग्रज गव्हर्नर तर सुखरूप राहिला परंतु ती युवती भारतीय इतिहासात ‘अग्नीकन्या’ म्हणून अजरामर झाली, तिचं नाव बीना […]

मोफत ब्लॉग – blogger की wordpress

संगणक क्षेत्रात युनिकोडचे आगमन होताच भारतीय भाषांना देखील संगणकीय सोपे रूप प्राप्त झाले.कधीकाळी महादिव्य अशा कसोट्या पार करत संगणकावर मराठी लेखन करावे लागत असे जे की आता अत्यंत सोपे काम झाले आहे.वाऱ्यावरती लिहावे तसे वेगाने मराठी अक्षरे संगणकाच्या पडद्यावर उमटवणे आता सहज शक्य झाले.किंबहुना बहुसंख्य आधुनिक मराठी प्रेमी युवा पिढीने ते सहजगत्या अवगत देखील केले […]

मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन

शिवकाळात या महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या भूमीला लाभेलेले थोर संत रामदास वर्तमान अन भविष्याचा वेध घेत आपल्या श्लोकातून म्हणतात “आहे तेवढे जतन करावे | पुढे आणिक मेळवावे | महाराष्ट्र राज्य करावे | जिकडे तिकडे || “   याच संतभूमीची शिकवण घेऊन वाढलेले आजचे आधुनिक मराठी जन,महाराष्ट्राच्या माय मराठी ची पताका सर्वदूर करण्यास अजून एकदा सिद्ध जाहले […]

जॅक्सन वध

जॅक्सन चा वध

जॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे   २१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन […]

सर्व्हर

सर्व्हर – म्हणजे जो सर्व्ह करतो तो सर्व्हर,कधीही रिक्वेस्ट आली की डाटा सर्व्ह करायचं काम ज्याकडे असतो तो सर्व्हर, आता सर्व्हर म्हणजे ते मशीन जे अहोरात्र, न थकता,न थांबता चालुच असतं,अगदी दिवसाचे चोविस तास,आठवड्याचे सातही दिवस,अगदी वर्षभर,आयुष्यभर,जो पर्यंत चालण्याची शक्ती आहे तोपर्यंत फक्त चालुच रहायचं अन आलेल्या रिक्वेस्ट ला प्रतिसाद देउन त्यांना हवा तो डाटा […]

बटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक

भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले?) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र […]

दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी

सुमारे २०० वर्षांपुर्वी,वाघिणीचं दुध म्हणविल्या गेलेल्या इंग्रजी भाषेच्या आगमनाच्या काळात ‘मराठी भाषेचे व्याकरण‘ वयाच्या विसाव्या वर्षी लिहून ते पूर्ण करणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२), तर्खडकर भाषांतरमाला या ग्रंथांच्या रूपाने सर्वपरिचित आहेतच. इंग्लिश भाषा शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना ती भाषा शिकणं सोपं वाटावं, या हेतूनं दादोबांनी ग्रंथाची रचना इंग्लिश व्याकरणाच्या पद्धतीनं केली. या […]

लोकहितवादी गोपाळराव देशमुख

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी नवशिक्षणाची कास धरून लेखणीद्वारे समाजसुधारकाच्या भूमिकेत आलेल्या केवळ मोजक्या थोर लोकांपैकी एक होत ‘लोकहितवादी‘ अर्थात गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींची शतपत्रे नावाने प्रसिद्धी मिळालेल्या लेखमालेवरून लोकहितवादी आपल्या परिचयाचे आहेत.गोपाळराव देशमुखांना मिळालेली हि ‘लोकहितवादी‘ ओळख मुळात त्यांनी लेखक म्हणून वापरलेले टोपणनाव आहे.गोपाळ हरी देशमुख (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ – ऑक्टोबर ९, इ.स. […]